Published On : Wed, Apr 7th, 2021

शहराच्या ८४ शासकीय केन्द्रांमध्ये आता लसीकरणाची व्यवस्था

नागरिकांनी कोरोना साखळी तोडण्यासाठी लस घ्यावे : महापौरांचे आवाहन

नागपूर : नागपूरात लसीकरण मोहिमेला गती प्रदान करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे दवाखाने, रुग्णालय व शासकीय रुग्णालय मिळून तब्बल ८४ केन्द्रांवर नि:शुल्क लसीकरण केल्या जात आहे. या सर्व केन्द्रांवर ४५ वर्षे वय व त्यावरील वयोगटाच्या नागरिकांना लस दिली जात आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण केल्या जाईल. काही केन्द्रांमध्ये रात्री १० वाजेपर्यंत सुध्दा लस दिली जाईल.

महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी पात्र वर्गातील सर्व नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे. लस घेतल्यानंतर कोरोनाची तीव्रता कमी होते. त्यांनी सांगितले की ८ एप्रिल पासून विशेष मोहिम, विशेष वर्गाकरीता राबविली जात आहे. ही मोहिम ४५ वर्षे वयोगटातील व त्यावरील नागरिकांसाठी आहे. या मोहिमेसोबत सामान्य नागरिकांना सुध्दा याच केन्द्रांमध्ये लस दिली जाणार आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ही त्यांनी केले.

आज सर्व चालकांचे लसीकरण
मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांचे निर्देशानुसार ४५ वर्षे वरील वयोगटातील ऑटो रिक्शा चालक, सायकल रिक्शा चालक, ई-रिक्शा चालक, काली-पीली टॅक्सी चालक, ओला-उबेर टॅक्सी चालक व खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये काम करणा-या नागरिकांचे ८ एप्रिल ला सर्व शासकीय केन्द्रांमध्ये लसीकरण केल्या जाईल. या मोहिमेसोबत सामान्य नागरिकांना सुध्दा याच केन्द्रांमध्ये लस दिली जाईल. लसीकरणासाठी येणा-या नागरिकांनी आपल्यासोबत आधारकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसेंस, पासपोर्ट इत्यादी शासकीय परिचय पत्र सोबत ठेवावे. टायगर ऑटो रिक्शा संघटनेचे मार्गदर्शक श्री. विलास भालेकर यांनी नागपूर शहरातील सर्व ऑटो रिक्शा चालकांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.