Published On : Wed, Mar 3rd, 2021

खाजगी रुग्णालयात ही लसीकरण सुरु

Advertisement

लसीकरण केन्द्रांवर गर्दी न करण्याचे महापौर, आयुक्त यांचे आवाहन

नागपूर: रात ज्येष्ठ नागरिक व को-मोरबिड नागरिकांसाठी लसीकरण मोहिमेला अधिक गति प्रदान करण्यासाठी केन्द्र शासनाने पाच खाजगी रुग्णालयांना परवानगी दिली असून त्याठिकाणी शासन निर्धारित शुल्क रु २५० भरुन लस घेता येईल. लता मंगेशकर रुग्णालय, सीताबर्डी, मोघरे चाईल्ड हॉस्पीटल, सक्करदरा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कँसर रुग्णालयामध्ये लसीकरणाची सुरुवात झाली. बुधवारपासून गिल्लूरकर रुग्णालय, सक्करदरा तसेच सेनगुप्ता रुग्णालय रविनगर येथे शासन निर्धारित शुल्क भरुन लसीकरण करण्यात येईल. महापौर श्री. दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी नागरिकांना लसीकरण केन्द्रांवर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अति.आयुक्त श्री. राम जोशी यांनी सांगितले की, बुधवारपासून शासकीय रुग्णालयात १०० नागरिकांना टोकन दिल्या जाणार आहे. त्यानंतर येणा-या नागरिकांना दुस-या दिवशी येण्याचे सांगितले जाईल. सध्या सगळया केन्द्रावर मोठी गर्दी होत आहे. लसीकरण कार्यक्रम सुरु राहणार आहे. नागरिकांनी गर्दी न करता लस घेण्याची गरज आहे.

शासकीय केंद्राची नावे
पाचपावली येथे दोन केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय दोन केंद्र, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय दोन केंद्र, झिंगाबाई टाकळी येथील पोलिस रुग्णालय, गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय, इमामवाडा येथील आयसोलेशन हॉस्पीटल, एम्स, ईएसआयएस हॉस्पीटल या केंद्रावर जाऊन ६० वर्षांवरील व्यक्तींना आणि ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस दिली जात आहे. ही शासकीय केंद्रे लसीकरणासाठी सकाळी ९ ते सायं. ५ या वेळेत सुरू राहतील.

काय सोबत असावे?
ज्यांना लस घ्यावयाची त्यांनी लसीकरण केंद्रावर आधार कार्ड घेऊन जायचे. आधार कार्ड नसेल तर ज्या ओळखपत्रावर जन्मतारीख असेल असे ओळखपत्रही नोंदणी ठिकाणी दाखवून नोंदणी करता येईल. जे फ्रंट लाईन वर्कर आहे त्यांनी त्यांच्या नोकरीतील ओळखपत्र आणि जे आरोग्य कर्मचारी आहे त्यांनी त्यांच्या रुग्णालयाचे ओळखपत्र दाखवून नोंदणी करवून घ्यावी. प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन नोंदणी करता येईल तसेच ‘कोवीन’ अथवा ‘आरोग्य सेतू’ या ॲपद्वारेही घरबसल्या ऑनलाईन नोंदणी करता येईल.

Advertisement
Advertisement