Published On : Fri, May 21st, 2021

४५ वर्षावरील नागरिकांचे शनिवारी लसीकरण

Advertisement

नागपूर : राज्य शासनाचे निर्देशानुसार ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांना शनिवारी २२ मे रोजी कोव्हीशिल्ड लसीचा पहिला व दूसरा डोज दिला जाईल. राज्य शासनाने या वयोगटातील नागरिकांना दोन्ही डोज देण्यासाठी लस उपलब्ध करुन दिले आहे. केन्द्र शासनाच्या नविन निर्देशानूसार आता कोव्हिशिल्ड चा दुसरा डोज १२ ते १६ आठवडयाच्या मधात नागरिकांना दयायचे आहे.

म्हणून नागरिकांनी याची नोंद घ्यावी. ज्या नागरिकांना कोव्हीशिल्डचा पहिला डोज १२ आठवड्या पुर्वी घेतला त्यांना दूसरा डोज़ दिला जाईल. मनपाच्या सर्व केन्द्रांवर लसीकरण केल्या जाईल. आरोग्य सेवक, फ्रंट लाइन वर्कर यांना सुद्धा दूसरा डोज दिला जाणार आहे. तसेच ड्राइव इन वैक्सीनशन केंद्रावर ४५ वर्ष वरील नागरिकांचा लसिकरण सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ वाजे पर्यत होईल.

Advertisement

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, आशिनगर झोन च्या मागे (डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे कोव्हॅक्सीन चा फक्त दूसरा डोज उपलब्ध आहे. तसेच १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण राज्य शासनाचे निर्देशानुसार सध्या स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दिली.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement