Published On : Mon, Apr 26th, 2021

लसीकरनच कोरोनावरील एक उत्तम उपाय-सुरेशभाऊ भोयर

Advertisement

– कामठी तालुक्यात लसीकरणा नंतर एकही मृत्यू नाही

कामठी :-कोरोणाविरुद्ध लढा देण्यासाठी लसीकरण हाच त्यावरील सर्वात प्रभावी उपाय आहे. कामठी तालुक्यातील एकूण 3 लक्ष 31 हजार 516 नागरिकांपैकी 38 हजार नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले आहे. तर कोविड वैक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर १५० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर रिसर्च केलं त्यत काही सकारात्मक तत्थ समोर आलं.आहे त्यानुसार सर्वच्या सर्व १५० जण बरे झाले १२५ जणं घरीच बरे झाले २५ जण हॉस्पिटलमध्ये गेले,त्यात केवळ ५जणांना ऑक्सिजनची गरज लागली,.

सर्वात सकारात्मक गोष्ट हि आहे कि १५० रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांपैकी कोणीही संक्रमित झालं नाही….
म्हणजेच आपण हळूहळू का होईना कोरोनावर विजय मिळवू लागलोय..

फक्त जरा संयम,धैर्य आणि साहस यांची गरज आहे.. असे मत माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांनी प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लसीकरणाची गती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

कामठी तालुक्यातील एकूण 3 लक्ष 31 हजार 516 लोकसंख्या असून ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील एकूण 38 हजार नागरीकानो लसीकरण करून घेतले .तर लसीकरण केल्यानंतर एकही जण दगावल्याची नोंद तालुक्यात झालेली नाही मात्र लसीकरनाचा पहिला व दुसरा डोज घेतल्या नंतर काही जण कोरोणाबधित झाले मात्र यापैकी बरेच जण बरेदेखील झाले आहेत.लसीकरणा नंतर कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केल्याने अनेकांना कोरोना ला दूर ठेवण्यापासून मदत झाली आहे.त्यामुळे कोरोणावर

लसीकरण हाच एकमेव उपाय आहे.त्यामुळे लसीकरण झाल्यानंतर सुद्धा सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे.