Published On : Sun, May 23rd, 2021

सोमवारपासून ‘लसीकरण आपल्या परिसरात’ मनपाची अभिनव मोहीम

Advertisement

नागपूर: शहरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागपूर महानगर पालिकेने ‘लसीकरण आपल्या परिसरात’ ही अभिनव मोहीम सोमवार २४ मे पासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत ४५ वर्षावरील नागरिकांना कोव्हीशिल्ड लस चा पहिला व दुसरा डोज़ दिल्या जाईल.

तसेच मनपाच्या सर्व केन्द्रांवर लसीकरण केल्या जाईल.
महापौर श्री दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त श्री राधाकृष्णन बी. यांच्या संकल्पपनेतून ही योजना प्रत्येक झोन मधे लागू करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी यांनी सांगितले की, सोमवारपासून प्रत्येक झोनच्या लसीकरण केन्द्रच्या परिसरात नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल. आठवड्यातील प्रत्येक दिवशी झोनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लसीकरण करण्यात येईल. प्रत्येक केंद्राच्या परिसरात ही मोहीम राबविण्याची योजना आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

राज्य शासनाचे निर्देशानुसार ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांना सोमवारी कोव्हीशिल्ड लसीचा पहिला व दूसरा डोज दिला जाईल. केन्द्र शासनाच्या नविन निर्देशानूसार आता कोव्हिशिल्ड चा दुसरा डोज १२ ते १६ आठवडयाच्या मधात नागरिकांना दयायचे आहे. म्हणून नागरिकांनी याची नोंद घ्यावी. ज्या नागरिकांना कोव्हीशिल्डचा पहिला डोज १२ आठवड्या पुर्वी घेतला त्यांना दूसरा डोज़ दिला जाईल. आरोग्य सेवक, फ्रंट लाइन वर्कर यांना सुद्धा दूसरा डोज दिला जाणार आहे.

तसेच ड्राइव इन वैक्सीनशन केंद्रावर ४५ वर्ष वरील नागरिकांचा लसिकरण सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ वाजे पर्यत होईल.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, आशिनगर झोन च्या मागे (डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे कोव्हॅक्सीन चा फक्त दूसरा डोज उपलब्ध आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दिली.

 

24.5.2021 V.P