नागपूर : येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संचालित मुलींचे वसतीगृह याचे उद्घाटन आज दि.०७ मे ला महापौर श्री दयाशंकरजी तिवारी व कुलगुरु श्री संजय दुधे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका डॉ परिणीता फुके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
इंदिरा गांधी रुग्णालय येथे कोरोना लसीकरण सुरु असून नागरिक या सोईचा लाभ घेत आहे. परंतु याच लसीकरण केंद्रावर नागरिकांची अतिशय गर्दी होत असल्यामुळे नागरिकांच्या भरपूर तक्रारी येत होत्या, तसेच लसीकरणाकरीता येणा-या वयोवृद्ध नागरिकांना भर उन्हात उभे राहावे लागत होते.
या सर्व तक्रारीला अनुसरून नगरसेविका डॉ परिणीता फुके यांनी मा.महापौर श्री दयाशंकरजी तिवारी यांना या समस्या अवगत करून दिले व इंदिरा गांधी रुग्णालय समोरील RTMNU चे मुलींचे वस्तीगृह ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरनासाठी उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली होती. त्याअनुषंगाने आज या लसीकरण केंद्राचे उद्घाट्न करण्यात आले.
याप्रसंगी धरमपेठ झोन सभापती सुनिल हिरणवार, सहाय्यक आयुक्त प्रकाश वराडे, डॉ चिमुरकर, डॉ किमतकर, राम मुंजे, रवि वाघमारे उपस्थित होते.

 
			



 







 
			 
			
