Published On : Mon, Jun 16th, 2025
By Nagpur Today Nagpur News

मुख्यमंत्री चषक कुस्ती स्पर्धेच्या लोगोचे अनावरण

20 जून ते 22 जूनपर्यंत राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा विभागीय क्रीडा संकुलात
Advertisement

नागपूर : भारतीय कुस्ती संघ, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ, शहर कुस्तीगीर संघ नागपूर आणि नागपूर महानगरपालिका तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने येत्या २० ते २२ जून दरम्यान होणाऱ्या मुख्यमंत्री चषक 2025 अंतर्गत १५ वर्षाखालील अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण आणि कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी (ता.१६) मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून मनपा अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय क्रीडा उपसंचालक श्री. शेखर पाटील, मनपा उपायुक्त श्री. विनोद जाधव, मनपा क्रीडा अधिकारी डॉ. पियुष अंबुलकर, श्री.विनोद बघेल, श्री.दयाराम भोतमांगे, श्री. विनोद दाणी, श्री.विनोद कन्हेरे आदीसह क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकूल येथे 20 जून ते 22 जून 2025 पर्यंत १५ वर्षाखालील मुख्यमंत्री चषक कुस्ती स्पर्धा 2025 अंतर्गत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित केली आहे. यानिमित्त स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री.अजय चारठाणकर यांनी नागपुरात अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जात असल्याचा आनंद व्यक्त केले. नागपूरकरांना राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती पाहण्याची मोठी संधी उपलब्‍ध होत असल्याचे सांगत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

क्रीडा उपसंचालक श्री. शेखर पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रीडा क्षेत्राला मोठे सहकार्य केले आहे. तर राज्य सरकारतर्फे मानकापूर क्रीडा संकुलासाठी 700 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. यामुळे क्रीडा संकुल अत्याधुनिक पद्धतीने तयार होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शासन क्रीडा विभागाला अधिक दर्जेदार सुविधा पुरवित असल्यामुळे क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोठी मदत मिळत आहे.

Advertisement

तर यावेळी डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले की, नागपूर शहर हे कुस्तीचे केंद्र राहिले आहे. स्पर्धेसाठी चांगले वातावरण तयार झाले तर त्याची मोठी दखल घेतली जाते. नागपूरातील क्रीडा स्पर्धांना वाव देण्याचे काम खासदार क्रीडा महोत्सव या रुपाने मा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. यामुळे शहराचे आणि राज्याचे नाव उंचीवर पोहचले आहे. अशा कुस्ती स्पर्धाचे आयोजन शहरात होत असल्याने त्यांचा फायदा येथील खेळाडूंसाठी होणार आहे. खेळाडूंना चांगली संधी मिळण्याची गरज आहे. ती संधी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेने शहरातील खेळाडूंना उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मनपा क्रीडा अधिकारी डॉ. पियुष अंबुलकर यांनी केले, तर आभार श्री. विनोद बघेल यांनी मानले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.