Published On : Fri, Jul 30th, 2021

विद्यापीठ विद्यार्थी-शिक्षक कृतज्ञता सोहळा संपन्न

नागपूर विद्यापीठाच्या बौद्ध अध्ययन (एम ए बुद्धिस्ट स्टडी) पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांची नुकतीच अंतिम परीक्षा संपन्न झाल्यामुळे व कोव्हीड काळात प्रत्यक्ष संपर्क अशक्य झाल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी प्रत्यक्ष कृतज्ञता व अभिनंदन सोहळ्याचे आयोजन केले होते. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

कृतज्ञता व गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पाली व बुद्धी स्टडी पदव्युत्तर विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर निरज बोधी सर होते. विद्यार्थ्यांना बौद्ध विनय शिकविणारे डॉक्टर भदंत शीलवंत महास्थविर, बौद्ध शिक्षण पद्धती शिकविणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर तुळसा डोंगरे, दक्षिण-पूर्व आशियातील बौद्ध धम्माचा अभ्यास शिकविणाऱ्या प्राध्यापिका नीलिमा गजभिये व बौद्ध स्थापत्यकला शिकविणारे प्राध्यापक सुबोध गोरले सर यांचे याप्रसंगी अभिनंदन करुन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी विभाग प्रमुख म्हणून बौद्ध अध्ययन पदव्युत्तर विभागातील अभ्यासाचा फायदा समाजाचे लौकिक ऋण फेडण्यासाठी व्हावा, त्यासाठी पे बॅक टू द सोसायटी हा कार्यक्रम अमलात आणण्याचे व बौद्ध कल्चर समाजात रुजवीन्याचे आवाहन प्राध्यापक डॉक्टर नीरज बोधी सर यांनी केले. या प्रसंगी ऑनलाईन शिक्षणातील आपले अनुभव शिक्षकांनी कथन केले

याप्रसंगी बौद्ध अध्ययन च्या विद्यार्थिनी रंजनाताई ढोरे, पुष्पाताई ढाबरे, तनुजा झीलपे, कमल इंदूरकर, सखाराम मंडपे, परशराम पाटील, सुनिल लांडे, शामराव हाडके, डॉक्टर सतीश नगराळे, बबन मोटघरे, दिलीप गायकवाड, हिरालाल मेश्राम, सिद्धार्थ फोपरे आदींनी विद्यार्थ्यांच्या वतीने मागील 2 वर्षातील शैक्षणिक व ऑनलाईन अभ्यासाचे अनुभव कथन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्ध अध्ययन चे विद्यार्थी उत्तम शेवडे यांनी, प्रास्ताविक माजी न्यायाधीश परशराम पाटील यांनी तर कार्यक्रमाचा समारोप भिक्खू महेंद्र कौसल यांनी केला.