Published On : Sat, May 19th, 2018

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांची पत्र परिषद

Advertisement

Ramdas Athawle Conference
नागपूर: मागासवर्गीय विदयार्थ्‍यांच्‍या शैक्षणिक शिष्‍यवृत्‍तीसाठी महाराष्‍ट्र शासनाला केंद्र शासनाच्‍या सामाजिक न्‍याय मंत्रालयातर्फे 504 कोटी रू. चा निधी पाठविण्‍यात आला असून, विदयार्थ्‍यांच्या शिष्‍यवृत्‍तीमध्‍ये वाढ होण्‍यासाठी आपले मंत्रालय प्रयत्‍नशील असल्‍याचे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रवि भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

केंद्र शासन हे समाजातील वंचित घटकांवर होणा-या अत्‍याचाराविरोधात न्यायिक मार्गाने लढण्यासाठी तत्‍पर असून अॅट्रासीटी कायदयाचे संरक्षण करण्‍यासाठीही कटीबद्ध आहे. मागासवर्गीयांना बढती मधील आरक्षण मिळावे याकरिता संसदेच्‍या पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडण्‍यासाठी आपले मंत्रालय प्रयत्‍नशील असल्‍याची माहिती आठवले यांनी यावेळी दिली.