Published On : Thu, Aug 1st, 2019

केंद्रीय संरक्षणमंत्री व मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रसंतांना अभिवादन

अमरावती: केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले.

महाजनादेश यात्रेच्या शुभारंभासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री श्री. सिंह व मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह विविध मंत्री गुरुकुंज मोझरी येथे दाखल झाले.
मोझरी येथील गुरूकुंज आश्रमाच्या अध्यक्षा पुष्पाताई बोंडे, सरचिटणीस जनार्दन बोथे आदींनी आश्रमातर्फे केंद्रीय संरक्षणमंत्री श्री. सिंह व मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे स्वागत केले.

सार्वजनिक बांधकाम व महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, कृषी मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.