Published On : Wed, Aug 5th, 2020

ना. गडकरी यांनी घरीच केले श्रीराम पूजन रामरक्षा, हनुमान स्तोत्राचेही पठन

नागपूर: अयोध्येत आज ऐतिहासिक आणि भव्यदिव्य अशा श्रीराम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

त्याचवेळी नागपुरात केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, वाहतूक व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या घरीच सहकुटुंब श्रीरामाचे पूजन केले. याप्रसंगी ना. गडकरी यांच्या संपूर्ण कुटुंबाने रामरक्षा पठन, हनुमानचालिसा पठन करून आरती केली.

Advertisement

कोरोनामुळे अयोध्येस जाणे शक्य नसल्यामुळे अनेक मान्यवरांना आज आपापल्या घरीच भूमिपूजन समयी श्रीरामाचे पूजन करावे लागले.

Advertisement

ना. गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या श्रीराम पूजन प्रसंगी सौ कांचन गडकरी, मुलगा सारंग गडकरी, स्नुषा ऋतुजा निखिल गडकरी, मधुरा सारंग गडकरी, नातवंडे निनाद, अर्जुन, सानवी व नंदिनी गडकरी सहभागी झाले होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement