Advertisement
नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी रात्री पारडी येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली.
यावेळी आमदार कृष्णा खोपडे, भाजपचे नागपूर शहराध्यक्ष बंटी कुकडे, बाल्या बोरकर, प्रमोद पेंडके यांची प्रमुख उपस्थिती होती. गडकरी यांचे यावेळी जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी पूर्व नागपूर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उड्डाणपूल सात किलोमीटरचा असून याचे चार भाग आहेत. नागरिकांची सोय लक्षात घेऊन उड्डाणपुलाचे तीन भाग दि. १९ सप्टेंबरपासून खुले करण्यात येणार आहेत. ना. नितीन गडकरी यांनी आज या संपूर्ण पुलाची पाहणी केली आणि कामावर समाधान व्यक्त केले.