Published On : Wed, Jan 10th, 2024
By Nagpur Today Nagpur News

केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांच्या हस्ते होणार खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

12 जानेवारीला यशवंत स्टेडियमवर समारंभ : विदर्भ स्तरावर सहा खेळांचे आयोजन
Advertisement

नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या सहाव्या सिझनचे उद्घाटन शुक्रवारी 12 जानेवारी 2024 रोजी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती व प्रसारण मंत्री श्री. अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी बुधवारी (ता.10) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी श्री. आशिष मुकीम, श्री. अशफाक शेख आदी उपस्थित होते.

शहरातील यशवंत स्टेडियम येथे शुक्रवारी (12 जानेवारी) सायंकाळी 6 वाजता होणा-या उद्घाटन समारंभाला नागपूर शहरातील सर्व मा. आमदार, क्रीडा संघटक, प्रशिक्षक, खेळाडू यांची प्रमुख उपस्थिती असेल. 12 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत होणाऱ्या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये यावर्षी 55 खेळांच्या स्पर्धा होणार असून विजेत्यांना एकूण 1.35 कोटी रुपयांची बक्षिसे प्रदान केली जातील. यंदा खासदार क्रीडा महोत्सवामध्ये शहरातील 65 क्रीडांगणावर 55 खेळांच्या स्पर्धा होतील. यातील सहा खेळ विदर्भ स्तरावर रंगणार आहेत. विदर्भ स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या सहा खेळांमध्ये सायकलिंग, खो-खो, अॅथलेटिक्स, कबड्डी, बॅडमिंटन आणि ज्युडो यांचा समावेश आहे. 12 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता खासदार क्रीडा महोत्सवाच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्यात खेळाडू विविध प्रात्यक्षिके सादर करतील. उर्वरित सर्व खेळांच्या स्पर्धा स्थानिक नागपूर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी घेतल्या जातील.

Gold Rate
20 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,47,200/-
Gold 22 KT ₹ 1,36,900 /-
Silver/Kg ₹ 3,10,400 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विदर्भ स्तरावर खेळल्या जाणाऱ्या सहा खेळांचा तपशील

ॲथलेटिक्स: बक्षीस रक्कम – 7,95,900 रु.

12 ते 16 जानेवारी दरम्यान विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे खुले पुरुष व महिला, मुले व मुली12 वर्षाखालील, 14 वर्षाखालील, 16 वर्षाखालील, 18 वर्षाखालील वयोगटातील आणि 35 वर्षांवरील खेळाडूंसाठी.

कबड्डी: बक्षीस रक्कम – 5,58,000 रु.

12 ते 23 जानेवारी दरम्यान विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे ज्युनियर, सब ज्युनियर मुले व मुली आणि सीनिअर पुरुष व महिलांसाठी.

सायकलिंग: बक्षीस रक्कम – 1,59,200 रु.

21 जानेवारी रोजी दीक्षाभूमी चौकात मुले आणि मुली यांच्या 12 वर्षाखालील, 15 वर्षाखालील आणि 21 वर्षांखालील वयोगटात.

खो-खो: बक्षीस रक्कम – 3,45,000 रु.

12 ते 16 जानेवारी दरम्यान विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे पुरुष व महिला आणि 14 वर्षाखालील मुले व मुली.

ज्यूडो: बक्षीस रक्कम – 1,12,200 रु.

13 आणि 14 जानेवारी रोजी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, क्रीडा स्क्वेअर येथे 18 वर्षाखालील, 14 वर्षाखालील, 12 वर्षाखालील मुले आणि मुली.

बॅडमिंटन: बक्षीस रक्कम – 3,86,000 रु.

खुल्या पुरुष आणि महिला (एकल, दुहेरी आणि मिश्र दुहेरी), 10 वर्षाखालील वयोगटात मुले व मुली एकल. 13 वर्षाखालील, 15 वर्षाखालील, 17 वर्षाखालील वयोगटासाठी एकल व दुहेरी, ज्येष्ठ नागरीक 35 वर्षावरील, 45 वर्षावरील आणि 55 वर्षावरील वयोगट.

खासदार क्रीडा महोत्सवाच्या सहाव्या सिझनमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रत्येकी 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाईल. विमा प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही स्पर्धांमधील सर्व खेळाडूंनी संबंधित खेळांच्या अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन किंवा ऑफलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.

याव्यतिरिक्त, खेळाडू आणि संघ खासदार क्रीडा महोत्सवाच्या खालील कार्यालयात ऑफलाइन नोंदणी करू शकतात.

१) दक्षिण-पश्चिम नागपूर: नक्षत्र हॉल, प्रताप नगर चौक.

२) उत्तर नागपूर: जिंजर मॉल.

३) पश्चिम नागपूर: भारत नगर चौक.

४) पूर्व नागपूर: गिरनार बँक कार्यालय, सतरंजीपुरा

५) दक्षिण नागपूर: रेशीमबाग चौक.

६) मध्य नागपूर: चिटणीविस पार्क, महाल

७) मुख्य कार्यालय: ग्लोकल मॉल, सीताबर्डी.

सदार क्रीडा महोत्सव-6 च्या ठळक बाबी

17 दिवस

55 क्रीडा प्रकार

65 क्रीडांगण

2,325 संघ

4,800 ऑफिशियल्स

65,000 सहभागी खेळाडू

12,500 सामने

1,100 ट्रॉफी

12,300 मेडल्स

1,35,00,000 रुपये बक्षीस रक्कम

खासदार क्रीडा महोत्सवात होणा-या स्पर्धा

मॅरेथॉन, खो-खो, ॲथलेटिक्स, कबड्डी, बास्केटबॉल, टेनिस बॉल क्रिकेट, ब्रिज, प्रोफेशनल क्रिकेट, ज्यूडो, बॅडमिंटन, लेदर बॉल क्रिकेट, तिरंदाजी, सेपक टॅकरॉ, रायफल शूटिंग, तलवारबाजी, फुटबॉल, मलखांब, तायक्वांडो, रस्साखेच, हँडबॉल, गर्ल्स बॉक्स क्रिकेट, कुस्ती, टेबल टेनिस, वुशू, दिव्यांगांच्या क्रिडा स्पर्धा, बॉक्सिंग, पंजाकुस्ती, हॉकी, लॉन टेनिस, व्हॉलिबॉल, जलतरण, रोप स्किपिंग, सॉफ्टबॉल, जिम्नॅस्टिक, ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धा, स्केटिंग, सायकलिंग, ओ वूमनिया, बॉडी बिल्डिंग, योगासन, फुटसल, आट्या-पाट्या, अश्टेडू, कॅरम, बेंच प्रेस पॉवर लिफ्टींग, मिनी गोल्फ, कोशिकी, कराटे, क्वॉन की डू मटेरियल आर्ट, बुद्धिबळ, थ्रो बॉल, फ्लोर बॉल, ॲरोबिक्स अँड फिटनेस, लंगडी, पिट्टू, मास्टर्स ॲथलेटिक.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement