Published On : Tue, Oct 10th, 2023
By Nagpur Today Nagpur News

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे विमानतळावर स्वागत

Advertisement

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे दुपारी सव्वादोनच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले. विमानतळावरूनच ते तेलंगानातील आदिलाबादच्या कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने रवाना झाले.

तेलंगाना राज्यातील आदिलाबाद येथे एका सार्वजनिक सभेला ते दुपारी चारच्या सुमारास संबोधित करणार आहेत. सभेनंतर ते हैदराबाद येथे जाणार आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आज त्यांचे नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार,अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे,अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप पाटील,पोलीस उपायुक्त विजय सागर,आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार मोहन मते यांनी स्वागत केले.

Advertisement

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.