Published On : Fri, Feb 14th, 2020

अज्ञात ट्रक च्या धडकेने तरुणाचा मृत्यु

कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी नागपूर महामार्गावरील संजीवनी लॉन समोर नागपूर हुन कामठी कडे भरधाव वेगाने जात असलेल्या अज्ञात ट्रक ने सारख्याच दिशेने कामठी कडे जात असलेल्या दुचाकीस्वाराला दिलेल्या जोरदार धडकेतून घडलेल्या गंभीर अपघातात जख्मि तरुणाचे दोन्ही पाय तुटल्याची घटना घडली असता जख्मि तरुणाला उपचारार्थ त्वरित नागपूर च्या मेयो इस्पितळात हलविण्यात आले मात्र उपचारदारम्यान जख्मि तरुणाचा मध्यरात्री 3.15वाजता दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतक तरुणाचे नाव आरोफ अन्सारी हबीबुल रहमान अन्सारी वय 40 वर्षे रा बुनकर कॉलोनी कामठी असे आहे.

प्राप्त माहिती नुसार सदर मृतक हा स्वतःच्या सी बी 100 दुचाकीने कामठी नागपूर महामार्गावरील साईनाथ ढाब्या मध्ये जेवण करून घरी जाण्यासाठी निघाले असता दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रक चालकाने सदर घटनास्थळी दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री 12.15वाजता घडली .

घटनेची माहिती जुनी कामठी पोलिसांना मिळताच पोलिसानी त्वरित घटनास्थळ गाठून जख्मि तरुणाला उपचारार्थ त्वरित नागपूर येथील मेयो इस्पितळात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान मध्यरात्री 3.15 वाजता दुर्दुवी मृत्यू झाला.पोलिसानी यासंदर्भात अज्ञात ट्रक चालका विरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.तर मृतकाच्या कुटुंबात 3 मुली व एक मूलगा , व भावंड असा आप्तपरिवार आहे …तसेच मृतकाची पत्नी नुकतेच सहा महिन्या आधी मरण पावली हे इथं विशेष!

संदीप कांबळे कामठी