Published On : Mon, Apr 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

हिंगणा तालुक्यातील दुर्दैवी घटना;विहिरीत पडलेली चप्पल काढताना युवकाचा मृत्यू

Advertisement

नागपूर : हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विहिरीत पडलेली चप्पल काढण्याच्या प्रयत्नात १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना वेलाहरी गावाजवळ घडली.

मृत तरुणाचे नाव अनिकेत उत्तमराव सोनटक्के असे असून तो न्यू नरसाळा रोडवरील भारतमाता नगर परिसरातील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास अनिकेत आपल्या मित्रासोबत छायाचित्रे काढण्यासाठी बावडी विहिरीजवळ गेला होता.

Gold Rate
Apr 132026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,51,300 /-
Gold 22 KT ₹ 1,40,700 /-
Silver/Kg ₹ 2,40,600/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी त्याची चप्पल चुकून विहिरीत पडली. ती बाहेर काढण्यासाठी तो विहिरीच्या काठावर झुकला असता त्याचा तोल गेला आणि तो थेट पाण्यात पडला. पोहता न आल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

या प्रकरणी राज गोपाल सोनटक्के (वय २१) यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement