Published On : Sat, Aug 29th, 2020

आजपासून कोव्हीड ची आर.टी.पी.सी.आर चाचणी पूर्ववत

नागपूर : कोव्हीड-१९ चे संक्रमण शोधुन काढण्यासाठी ॲण्टीजिन टेस्ट आणि आर.टी.पी.सी.आर टेस्ट याप्रमाणे दोन प्रकारे चाचण्या घेतल्या जातात. त्यापैकी ॲण्टीजिन टेस्ट ही रॅपीड टेस्ट आहे व त्यामध्ये त्वरित अहवाल येतो.

आर.टी.पी.सी.आर टेस्ट ची तपासणी प्रयोगशाळेव्दारे केल्या जाते. परंतु मागील दोन-तीन दिवसापासून इंदीरागांधी मेडीकल कॉलेज व हॉस्पीटल, माफसू व एम्स येथील परीक्षणासाठी आलेले सॅम्पल मोठया प्रमाणात जमा झाल्यामुळे तेथे कामाचा ताण वाढला तसेच तेथील काही कर्मचारी देखील पॉझीटीव्ह आल्यामुळे आर.टी.पी.सी.आर कोव्हीड चाचणी करीता तूर्त सॅम्पल पाठवू नये अशी, त्यांनी विनंती केल्यामुळे दोन दिवस आर.टी.पी.सी.आर सॅम्पल घेण्यात आले नाही.

मात्र रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लॉ कॉलेज, मॉरिस कॉलेज, आर.पी.टी.एस, रवीभवन, राजनगर व पाचपावली येथील सहा केंद्रावर आर.टी.पी.सी.आर चाचणी दि. २९ ऑगस्ट २०२० पासून पूर्ववत सुरु करण्यात येत आहे, असे म.न.पा.च्या आरोग्य विभागाव्दारे कळविण्यात आले आहे.