Published On : Fri, Feb 2nd, 2018

OCW जलकुंभ स्वच्छता मोहीम अंतर्गत दिघोरी जलकुंभ स्वच्छता ३ फेब्रुवारी रोजी

Advertisement

Blue ESR Cleaning
नागपूर: मनपा व ऑरेंज सिटी वॉटर यांनी जलकुंभ स्वच्छ करण्यासाठी सुरक्षित व शास्त्रीय पद्धत अमलात आणली आहे. ४ वर्षांपूर्वी मनपा-OCWने ही पद्धत सुरु केली व प्रत्येक जलकुंभ वर्षातून एकदा स्वच्छ करण्याचा संकल्प केला. सध्या या मोहिमेची ४ ठी फेरी सुरु आहे.

प्रत्येक घराला स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरत मनपा-OCW ने सलग चौथ्या वर्षी जलकुंभ स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत ३ फेब्रुवारी २०१८ , शनिवारी, दिघोरी जलकुंभ स्वच्छतेचे काम हाती घेण्यात येत आहे. या कामामुळे दिघोरी जलकुंभावरील खालील भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील:

पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:सर्वश्री नगर , वैभव नगर , कीर्ती नगर, तेलीफोन नगर, बेलदार नगर, गोपाल कृष्ण नगर, तुकडोजी नगर, राहुल नगर, गजानन नगर, राम कृष्ण नगर, आझाद कौलोनी, निराला सोसायती.

यादरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठाही शक्य होणार नसल्याने मनपा-OCW यांनी नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.