Published On : Sat, Jun 28th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या बी-पार्क प्रकल्पाअंतर्गत कोतवाली परिसरात पाइल घसरून पोकलेनवर कोसळली;तीन मजूर जखमी!

- आजूबाजूच्या इमारती रिकाम्या करण्याचे आदेश
Advertisement

नागपूर : नागपूरच्या कोतवाली परिसरातील बुधवार बाजार भागात बी-पार्क प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या बांधकाम स्थळी शनिवारी सकाळी मोठा अपघात झाला. खोदकामा दरम्यान पाइल अचानक घसरून जवळ उभ्या असलेल्या दोन पोकलेन मशीनवर कोसळली. या घटनेत तीन कामगार जखमी झाले असून, सुदैवाने कुणाच्याही जीवाला धोका निर्माण झाला नाही.

बी-पार्क प्रकल्प नागपूर महानगर पालिकेचा असून वीआयपीएल कंपनी अंतर्गत हे काम सुरू आहे.

ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या समोरच घडली. जखमी कामगारांची नावे अजित परमानिक, मनीष नागेश्वर आणि चिंटू कुमार अशी असून, तिघांनाही तत्काळ १०८ अँम्ब्युलन्सद्वारे मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना प्राथमिक उपचार दिले असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ स्थापत्य अभियंता सुनील काठे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासणी करून स्पष्ट केले की, कुणीही ढिगाऱ्याखाली अडकलं नाही आहे. दरम्यान, अपघाताच्या ठिकाणाजवळच असलेली “चावला स्टोअर्स – चंदना इंटरप्रायझेस” ही जुनी आणि कमकुवत इमारत तात्काळ रिकामी करण्यात आली. संबंधित मालकाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisement

सुरक्षेच्या दृष्टीने आजूबाजूच्या इतर इमारतीही खबरदारी म्हणून रिकाम्या करण्यात आल्या आहेत. प्राथमिक तपासात पाइल अचानक घसरल्यामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने तत्काळ बचावकार्य राबवून मोठी दुर्घटना टळवली आहे.

सध्या अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी सुरू असून, प्रशासनाकडून सर्व बांधकाम प्रकल्पांमध्ये सुरक्षा उपायांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.