Published On : Sat, Aug 29th, 2020

इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज अंतर्गत गोपलानी सी एस आर निधीतून देणार 10 सायकल

– पहिल्या स्टेक होल्डर्स बैठकीत घोषणा

नागपूर : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील स्मार्ट सिटी कार्यालयाच्या कॉन्फरेन्स हॉल मध्ये स्टेक होल्डर्सची पहिली बैठक शनिवारी आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत स्मार्ट सिटीचे मु्ख्य कार्यकारी अधिकारी श्री महेश मोरोणे, मनपा कॉन्ट्रॅक्टर वेलफेयर अससोसिएशनचे अध्यक्ष श्री विजय नायडू, पदाधिकारी जीतु गोपलानी, प्रशांत ठाकरे, स्मार्ट सिटीचे अधिकारी श्री राजेश दुफारे, श्री शील घुले, डॉ परिणिता उमरेडकर प्रामुख्याने उपस्थित होते.

श्री महेश मोरोणे यांनी स्मार्ट सिटीच्या वतीने नागपुरात सुरू असलेल्या विविध कामांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, स्मार्ट सिटीच्या वतीने नागपूरला राहण्योयाेग्य, सुरक्षित, निरोगी शहर करण्यात येत आहे. या कामात नागरिकांचा मोठया प्रमाणात सहभाग मिळत आहे. स्मार्ट सिटीच्या उद्देश नागरिकांना केंद्र बिंदू ठेवून योजना तयार करायची आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सायकलिंगला प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे काम आहे. सायकलिंग केल्याने प्रदूषण कमी करता येइल तसेच नागरिकांचे आरोग्यही सुदृढ राहील. त्यांनी कॉन्ट्रॅक्टर अससोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना या कार्यात मदत करण्याचे आवाहन केले.

त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कॉन्ट्रॅक्टर अससोसिएशनचे ज्येष्ठ पदाधिकारी श्री जीतू गोपलानी यांनी त्यांच्या ‘फन प्लॅनेट’तर्फे 10 सायकल देण्याची घोषणा केली. या माध्यमातून नागपुरात सायकलिंगला प्रोत्साहन देण्यात येइल. श्री मोरोणे यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की नागपुरात 17 किलोमीटरचा सायकलिंगसाठी विशेष रस्ता तयार केला जात आहे. याच्या माध्यमातून सायकलिंग प्रोत्साहन मिळेल, असा विश्वासही मोरोणे यांनी व्यक्त केला.
त्यांनी सांगितले की महापौर, आयुक्त, स्मार्ट सिटी चे संचालकांची उपस्थितीत एका समारंभात स्मार्ट सिटी ला
सायकल दिल्या जातील.

कार्यक्रमात आभार श्रीमती प्रणिता उमरेडकर यांनी मानले. कार्यक्रमात डॉ अर्चना अडसड, मोईन हसन, राहुल पांडे, सायकल मेयर दीपांती पाल, सोनाली गेडाम, पराग अर्मल उपस्थित होते. यावेळी श्री मोरोणे यांनी लीव्ह मॅनॅजमेण्ट अँप्लिकेशन सॉफ्टवेअर इनहाऊस तयार केल्या बद्दल निलेश बोले त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. श्री मोरोणे यांनी संपुर्ण इ-गव्हर्नन्स चमूचे अभिनंदन केले आणि इतर विभागाला या पासून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले.

सुट्टीच्या अर्जासाठी सॉफ्टवेअर तयार करण्याकरिता स्मार्ट सिटीचे निलेश बोले यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला.