Advertisement
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा असे विधान केले होते. त्यांचा रोख उद्धव ठाकरेंकडे होता.
यावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधला. शरद पवार म्हणाले,’आम्ही सामुहिकपणे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार आहे.
दरम्यान शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत मोदींची गॅरंटी फेल गेली.
त्यांनी महाराष्ट्रात जिथे सभा घेतल्या तिथे जवळपास सर्व जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घ्यावात, असे पवार म्हणाले.
image.png