नागपूर: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा औरंगजेब म्हणून उल्लेख केला. यावरून भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.महाराष्ट्र आणि देशातील जनता ही गोष्ट खपवून घेणार नाही. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दूर केले.
सख्ख्या भावासारख्या देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचीच वृत्ती औरंगजेबासारखी आहे,या शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला.
मुंबईत काँग्रेस नेते नितीन कोडवते आणि त्यांच्या पत्नी चंदा कोडवते यांनी पक्षाला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला.
यावेळी बावनकुळे उपस्थित असून त्यांनी प्रसार मध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंना २०२४ ची लोकसभा सर्वांत वाईट ठरेल उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त आणि निराश मनस्थितीत आहेत. ठाकरे हा सत्तेसाठी पिसाळलेला नेता आहे.
०४ जून येऊ द्या,मग तुम्हाला दिसेल. २०२४ ची लोकसभा निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यातील सर्वांत वाईट निवडणूक असेल,या शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.