मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती,असे विधान केले. तसेच काँग्रेसेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला असल्याचेही ते म्हणाले. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत खळबळजनक दावा केला आहे. उद्धव ठाकरे हे शिंदेंनाच मुख्यमंंत्री करणार असल्याचं राऊतांनी सांगितले .
भाजपने अडीच-अडीच वर्षाचा शब्द मानला नाही. तर पवारांनी शिंदे ज्युनिअर असून आमची लोकं त्याच्या हाताखाली करणार नाही सांगितल्याचे राऊत म्हणाले.
ज्यांच्या दावणीला चोरलेला धनुष्यबाण बांधलेला आहे तो योग्य आहे का? रोज उठून दिल्लीला उठाबशा काढता त्या बाळासाहेब ठाकरेंना मान्या आहेत का? एकनाथ शिंदेंना आत्मचिंतनाची गरज आहे, त्यांना जर आत्मचिंतनाला कामाख्य मंदिरामध्ये किंवा अन्य कुठे जावं आणि आत्मचिंतन करावं. मूळ शिवसेनेबाबत आपण जी काह विधाने करतोय त्यात किती सत्य आहे? काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कधीच कोणी बांधली नाही. ज्यांच्यासोबत आज ते बसलेत त्यांनी शब्द पाळला नाही.
त्या निर्णयामध्ये एकनाथ शिंदे सामील होते, तो सामुदायिक निर्णय होता.मविआ तयार करून सरकार बनवावे लागेल ही भूमिक एकनाथ शिंदेंची होती. तसेच जर भाजपने ५०-५० टक्केचा शब्द पाळला असता तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते, असा गौप्यस्फोटही राऊत यांनी केला.
भिवंडी में खेत की जमीन पर कब्जे का आरोप
मुंबई आंदोलन पर जरांगे पाटील का बड़ा ऐलान.. #Jarange #MarathaReservation #MumbaiProtest #News
Ratnagiri: लोटे MIDC की बदहाल सड़कों पर पहुंचे Aaditya Thackeray #MaharashtraNews
Mohan Bhagwat के America दौरे पर Sanjay Raut का बड़ा बयान! #SanjayRaut...
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...





