Published On : Thu, Apr 4th, 2024
By Nagpur Today Nagpur News

उद्धव ठाकरेंनी त्यांना पाचदा खासदार केले,पण आता…;आदित्य ठाकरेंचा भावना गवळींवर हल्लाबोल

Advertisement

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेने ज्यांना खासदार बनवले त्यांना आता शिंदे गट उमेदवारीही देत नाहीये, त्यामुळे गद्दारांनी विचार करावा,असे विधान उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी केला. महायुतीने भावना गवळी यांना यवतमाळ-वाशिम येथून उमेदवारी दिली नाही. त्यावरुन आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

ज्यांना शिवसेनेने, उद्धव ठाकरेंनी अनेक वेळा खासदार बनवले. त्यामध्ये एक व्यक्ती अशी आहे की त्यांना पाच वेळा खासदार बनवले.त्यांना दहा तास थांबून सुद्धा तिकीट मिळाले नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी भावना गवळी यांचे नाव न घेता केली.

तसेच शिंदे गटाकडून जून दोन-तीन जणांचं तिकीट कापले जाणार आहे. मग त्यांच्यासोबत जाऊन नक्की मिळवले तरी काय? जी गद्दारी करायची होती.

उद्धव साहेबांसोबत पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसायचा होता, ते त्यांनी खुपसलंच आहे. महाराष्ट्रासोबत बेईमानी केलेली आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.जे पुढचे चाळीस गद्दार आहे त्यांनी सुद्धा आता विधानसभेबाबत विचार करावा की आपले काय होईल. कारण,आता एक-एक विकेट पडायला सुरुवात झालेली आहे, असे चित्र दिसत आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.