Published On : Mon, May 6th, 2024
By Nagpur Today Nagpur News

उद्धव ठाकरेंनी भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचा प्लॅन आखला होता; मुख्यमंत्री शिंदेचा दावा

Advertisement

ठाणे :महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना मुख्यमंत्री पदावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी भाजपाला घाबरवून २५-३० आमदार फोडायचे पूर्ण प्लॅनिंग तयार केले होते,असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

उद्धव ठाकरेंना ५ वर्ष मुख्यमंत्रि‍पदी बसायचे होते.भाजपाचे संख्याबळ कमी व्हावं यासाठी १२ जणांना निलंबित केले.भाजपाच्या ४-५ नेत्यांना अटक करायचे प्लॅनिंग होते, असेही शिंदे म्हणाले.

Gold Rate
Mar 30,2026 - Time 10.26Hrs
Gold 24 KT ₹ 1,50,500 /-
Gold 22 KT ₹ 1,39,500 /-
Silver/Kg ₹ 2,33,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी महायुतीची बैठक आयोजित केली होती. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. वर्धापन दिनावेळी आईचं दूध विकणारी टोळी आणि बरेच काही भाषण केले.

मला राज्यसभा, विधान परिषदेच्या प्रक्रियेतून बाहेर काढले. भाजपाच्या लोकांना आत घालून मलाही संपवण्याचे कटकारस्थान होते, एका गुन्ह्यात माझे खोटे नाव गोवण्याचे सुरू होते, अशी माहितीही मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement