Published On : Tue, Apr 16th, 2024

उदयनराजे भोसले यांची प्रतीक्षा संपली ;साताऱ्यातून भाजपने जाहीर केली लोकसभेची उमेदवारी

Advertisement

सातारा– लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रतीक्षेत असलेले उदयनराजे भोसले यांना भाजपने साताऱ्यातून उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघातून उदयनराजेंच्या नावाची चर्चा सुरु होती.

उदयनराजे यांनी देखील आपल्यापरीने तयारी सुरु केली.अखेर भाजपकडून त्यांना मंगळवारी उमेदवारी जाहीर केली.

साताऱ्यातून लोकसभेसाठी तिकीट मिळावे यासाठी उदयनराजे आग्रही होते. यासाठी त्यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती.

उदयनराजे दिल्ली भेटीनंतर राज्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी साताऱ्यात जल्लोष सुरु केला.मात्र,आतापर्यंत त्यांच्या नावाची घोषणा झाली नसल्याने त्यांचे कार्यकर्ते चिंतेत होते. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची बारावी यादी जाहीर केली आहे.

या यादीमध्ये उदयनराजे यांचे नाव आहे. उदयनराजे यांच्यासमोर शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांचे आव्हान असणार आहेत. त्यामुळे महायुतीचे उदयनराजे विरुद्ध महाआघाडीचे शशिकांत शिंदे अशी लढत साताऱ्यात पाहायला मिळेल.