नागपूर : बुटीबोरी एमआयडीसीमध्ये असलेल्या केमटेक कंपनीत भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात मशीनखाली चिरडून दोन मजुरांचा मृत्यू झाला.
तर एक जण गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच मदतकार्य सुरू झाले असून जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नागपुरातील बुटीबोरी येथील एमआयडीसी येथे केमटेक इंडिया नावाची कंपनी कॅल्शियम पावडर बनवते.या कंपनीत त्यांच्या शिफ्टमध्ये 10 कामगार काम करत होते. त्यानंतर अचानक मशिनचा शाफ्ट तुटल्याने मशिनच्या खालच्या भागात काम करणाऱ्या कामगार शाफ्टखाली आले.
शाफ्टचा एक तुकडा दोन कामगारांवर पडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही मजूर गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतक मजूर धुमलाल दामे आणि नवदीप क्षीरसागर हे दोघेही मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत.