Published On : Mon, Feb 28th, 2022
By Nagpur Today Nagpur News

दिवसाढवळ्या स्वर्णकार व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या दोन महिला आरोपीवर गुन्हा दाखल

Advertisement

कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोंढा मार्गावर असलेल्या सोनी ज्वेलर्स नामक सोन्या चांदीच्या दुकानात महिला आरोपीनी तांब्याच्या धातू असलेल्या गहू मण्यांच्या मंगळसूत्राला सोन्याच्या रंगाचे पॉलिश चढवून ते मंगळसूत्र सोन्याचे दागिने असल्याची खोटी बतावणी करून हे दागिने गहाण ठेवायला आले असता यासंदर्भात दुकानात उपस्थित व्यापाऱ्याने त्या दागिन्याची बारकाईने तपासणी केल्यावर सदर दागिने बनावट असून आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच व्यापारि दुकानदाराने या महिला आरोपीला गोष्टीत गुंतवून ठेवत हळूच पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान स्थानिक जुनी कामठी पोलिसांनी वेळीच घटनास्थळी भेट देऊन फसवणूक होणाऱ्या घटनेचे गांभीर्य जाणून घेत होणारी फसवणुकीची घटना टाळली.ही घटना 24 फेब्रुवारीला दिवाढवळ्या 2 वाजता घडली असून फिर्यादी अंकुश मधुकरराव कुर्वे रा मोंढा रोड कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून नागपूर कुकडे ले आउट रहिवासी महिला आरोपीवर त्वरित भादवी कलम 420, 511 अनव्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली तसेच या प्रकरणातील अजून एका महिला आरोपीला आज दुपारी 2 दरम्यान अटक करण्यात आली असून यामध्ये मोठी टोळी पोलिसांच्या हातात लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.