Published On : Sat, Dec 7th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या वर्धमान नगर चौकात दोन ट्रकची समोरासमोर धडक; एक चालक जखमी तर दुसरा फरार

Advertisement


नागपूर : नागपुरातील वर्धमान नगर चौकात शनिवारी सकाळी दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण धडकेत एक ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला, तर दुसरा घटनास्थळावरून फरार झाला. जखमी चालकाला स्थानिक लोकांनी रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.

पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला. पहाटेची वेळ असल्याने जखमी चालक बराच वेळ रस्त्यावर पडून होता. लोकांनी पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर लकडगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. धडक दिल्यानंतर लगेचच आरोपी चालक ट्रकसह पळून गेला. त्याचवेळी अपघातग्रस्त ट्रक पीओपी बॅगने भरला होता. पोलिसांनी आरोपी चालकाचा शोध सुरू केला असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Gold Rate
Sept 29,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 47,300 /-
Gold 22 KT ₹ 1,36,5700 /-
Silver/Kg ₹ 2,22,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.