Published On : Tue, Aug 20th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील दोन बहिणींनी छत्तीसगड-भिलाई येथे संपत्तीसाठी केली आजीची हत्या !

Advertisement

नागपूर: उटाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपुरात राहणाऱ्या दोन बहिणींनी संपत्तीसाठी आजीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी महिला आरोपींकडून लुटलेला मुद्देमाल जप्त केला आहे.

उटाई पोलीस स्टेशन हद्दीतील पुरई येथील कुबेर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अतिंदर शहानी यांची अज्ञातांनी हत्या केली आणि दरोडा टाकून पळ काढला. पोलिसांनी वृद्ध महिलेच्या घराचा दरवाजा तोडून आत जाऊन पाहिले असता त्यांना वृद्ध महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. दरम्यान, महिलेची मुलगी नागपुरात राहते आणि तिच्या दोन्ही मुलींनी महिलेकडे पैशांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

यानंतर पोलिसांचे पथक नागपूरला रवाना झाले, तेथे सुरुवातीला आरोपींनी पोलिसांची दिशाभूल केली. मात्र पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आजीचा खून केल्यानंतर दरोड्याची कबुली दिली. आरोपींनी पोलिसांना सांगितले की, 24 जून रोजी दोघी बहिणी नागपूरहून छत्तीसगड एक्स्प्रेसमध्ये बसल्या. दुर्ग स्टेशनवर पोहोचल्या, तेथून त्या ऑटोने पुरई कुबेर अपार्टमेंटमध्ये आजीच्या घरी पोहोचल्या.

दार ठोठावल्यावर आजीने दरवाजा उघडताच मोठी नात दीपज्योत कौर हिने तिच्या आजीचे तोंड हाताने दाबले, त्यानंतर तिने तिच्या अल्पवयीन बहिणीसह महिलेचे हातपाय स्कार्फने बांधले.तसेच वृध्द महिलेच्या डोक्यावर वार करून हत्या केली. खून केल्यानंतर आरोपी बहिणींनी स्कूटरवरून कपाटात ठेवलेले दागिने, मोबाईल, रोख रक्कम आणि कागदपत्रे घेऊन पळ काढल. दोघीही स्कूटीने राजनांदगाव येथे पोहोचल्या.तेथे स्कूटी बसमध्ये टाकल्यानंतर त्यांनी नागपूर गाठले आणि नागपुरातील रेल्वे ट्रॅकच्या बाजूला स्कूटी पार्क केल्यानंतर ते आपल्या घरी पोहोचल्या. पाटणचे एसडीओपी आशिष बनछोर यांनी सांगितले की, गुन्हा दाखल केल्यानंतर तपास करून दोन्ही आरोपी मुलींना अटक करण्यात आली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.