
पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त दीपक अग्रवाल यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. फार्महाऊसमध्ये आर्थिक फायद्यासाठी मोठ्या रकमेचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पथकाने अचानक छापा टाकून जुगाऱ्यांना ताब्यात घेतले.
२४ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त-
पोलिसांनी घटनास्थळावरून २४ लाख ६३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात ७२ हजार ७५० रुपये रोख, १७ मोबाईल, दोन चारचाकी वाहने, सात दुचाकी, फरार आरोपींचे पाच मोबाईल आणि जुगारासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन चटयांचा समावेश आहे. ताशांची पानेही पोलिसांनी जप्त केली.

सात आरोपी फरार-
हरीश उर्फ मादी पराते, हरीश रमेश कुहीकर, प्रणय संजयराव जाधव, कार्तिक राजेश मैसकर, पवन सुधाकर रेवतकर, राकेश हिरालाल मेश्राम आणि आकाश अजय खोब्रागडे हे सात जण कारवाईदरम्यान पसार झाले. घटनास्थळी त्यांचे पाच मोबाईल सापडले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
फार्महाऊस बुक करणाऱ्याची चौकशी-
निकेश राजू श्रिपाते याने कथितरीत्या ‘टू सिस्टर्स’ फार्महाऊस बुक केल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी तीन गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. जुगाराची बैठक कोणी आयोजित केली, यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे आणि या प्रकरणाचे धागेदोरे मोठ्या जुगार टोळीपर्यंत पोहोचतात का, याचा तपास सुरू आहे.
आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम ४ आणि ५ अंतर्गत कारवाई करण्यात आली असून अटक आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी कलमना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.



