Published On : Fri, Mar 27th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील स्वागत लॉन्ससह १० विवाहस्थळे बिनपरवाना;ध्वनीप्रदूषणावर उच्च न्यायालयाचा बडगा!

Advertisement

नागपूर : सिव्हिल लाइन्स परिसरातील विवाह लॉन्स आणि क्लबमधून वाढणाऱ्या ध्वनी व वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने प्रशासनाला जोरदार फटकारले आहे. शहरातील प्रतिष्ठित भागातच नियमांचा भंग होत असल्याचे निदर्शनास येताच न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

सुनावणीत उघड झाले की, परिसरातील १३ विवाहस्थळांपैकी केवळ ३ ठिकाणांनाच अधिकृत परवानगी आहे, तर स्वागत लॉन्ससह तब्बल १० ठिकाणे बिनपरवाना सुरू असल्याचे स्पष्ट झाले. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याबद्दल न्यायालयाने कडक शब्दांत सुनावले.
लाउडस्पीकर, डीजे आणि फटाक्यांमुळे वाढणारा प्रचंड आवाज तसेच कार्यक्रमांमुळे होणारी गर्दी आणि वाहनांमुळे निर्माण होणारे वायू प्रदूषण नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देत न्यायालयाने स्पष्ट केले की, ठरवलेल्या डेसिबल मर्यादेचे उल्लंघन सहन केले जाणार नाही. रात्री १० नंतर साउंड सिस्टीम पूर्णतः बंद ठेवणे बंधनकारक असेल आणि आवाज कार्यक्रमस्थळापुरताच मर्यादित ठेवावा लागेल.

याशिवाय, प्रत्येक विवाहस्थळी ध्वनी व वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम स्पष्ट करणारे जनजागृती फलक लावणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.

Advertisement

न्यायालयाने इशारा दिला आहे की, पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.