नागपूर : पुण्यात 3 ऑक्टोबर बोपदेव घाट परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रात्री मित्राबरोबर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर या घाटात सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली.
मात्र आता या प्रकरणात अखेर पोलिसांना अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. या घटनेतील दोन संशयितांना गुन्हे शाखेने नागपूर मधून ताब्यात घेतले आहे. तसेच बोपदेव घाटातील घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.
बोपदेव घाटातील धक्कादायक घटनेमधील दोन संशयित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच कोंढव्यातील येवलेवाडी परिसरातील एका तरुणाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. मात्र या घाटबेतील संशयितांना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. कारण सध्या त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.
बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या धक्कादायक सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील तब्बल 40 गावे, वाड्या, वस्तींवरील अशा मिळून 450 नागरिकांची चौकशी केली आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील घाट, टेकड्यांच्या परिसरात लूटमार करणारे, विनयभंग, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराइतांची पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे.