Published On : Mon, Jul 30th, 2018

धरमनगर कन्हान हत्येतील एका आरोपीसह दोन बालगुन्हेगार ताब्यात.

कन्हान : – धरम नगर पिपरी कन्हान येथील हनुमान मंदिर समोर शुल्क वादाच्या कारणावरून पायावर व कमेरेवर चाकु मारून अभिषेक मालाधरे या युवकांची हत्या केली. मृतकांच्या परिवाराने व संतप्त जमावाने रात्री उशिरा पर्यंत पोलीस स्टेशनला घेराव केला होता. मध्यरात्री संतप्त लोकांनी आरोपीच्या घराची तोडफोड करून घर जाळ्याचा पर्यंत केला असता पोलीसानी घटनास्थळी पोहचुन तीन आरोपींना अटक केली .

धरमनगर पिपरी कन्हान येथील अभिषेक वलेंद्र मालाधरे वय १७ वर्ष हा आपल्या घरासमोर रविवार (दि.२९) ला सायंकाळी ६. ३० वाजता उभा असताना आरोपी यश मुकेश माहातो वय १७ वर्ष या दोघात शुल्क कारणाने भांडण झाले असता आरोपी यश घरी जावुन चाकु घेऊन मित्र मोहीत देविदास मडामे वय १६ वर्ष मु पिपरी यास सोबत घेऊन अभिषेक च्या घराकडे गले.

मागेच वडील मुकेश लालजी माहातो वय ४९ वर्ष मु.रामनगर पिपरी, हयानी मोटार सायकल ने पोहचुन हनुमान मंदिर समोर आरोपी व मित्रानी अभिषेक यांच्या पायावर, कमरेवर व कोथ्यावर चाकुने वार करून गंभीर जखमी केले असता जखमी ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान ला नेले असता गंभीर जखमी असल्याने मेयो दवाखाना नागपुर ला नेत इसताना रस्त्यात युवकांचा मुत्यु ़झाला.

माहीती मिळताच कन्हान पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे . घटनास्थळी थानेदार चंद्रकांत काळे, पोलीस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे, पी एस आय नितीन आगाशे व गुन्हे अन्वेषण नागपुर शाखेच्या पथक दाखल होऊन आरोपीचा शोध घेत आरोपी मुकेश माहातो यास अटक करून यश माहातो व मोहीत मडामे हे दोघेही बालगुन्हेगार असल्याने त्यांना ताब्यात घेतले .

घटनास्थळी पोलीस उशिरा पोहचल्याने मृतकांचे आई वडील, नातेवाईक व नगरातील सतंप्त लोकांनी रात्री पोलीस स्टेशनला घेराव करून आरोपीना अटक करण्याची मागणी केली .

मध्यरात्री काही संतप्त जमावाने आरोपी मुकेश माहातोच्या घराची तोडफोड करून मातीचे तेल फेकुन घर जाळण्याचा पर्यंत केला . असल्याने पोलीसानी घटनास्थळी पोहचुन आग विझवली व महेंद्र जानराव मालाधरे वय ४० वर्ष मु वराडा-कन्हान, रवि गणेश डोंगरे वय ५० वर्ष मु धरमनगर पिपरी, राजेश बबन आकोणे वय ३२ वर्ष मु दुर्गा चौक पिपरी या तीन आरोपींना अटक करून मध्यवर्ती कारागृह नागपुर ला रवानगी केली . रात्री पिपरी येथे पोलीस कडबंदोबस्त लावण्यात आला होता .

सोमवार ( दि.३०)ला दुपारी मृतदेह पोलीस स्टेशन सामोर ठेऊन आरोपीना कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच कन्हान शहरात वाढणा-या गुन्हेगारी व गुन्हेगार प्रवृत्ती च्या लोकावर अकुंश लावण्यात यावा या मागणीसह पोलीस प्रशासनावर संताप व्यकत करण्यात आला .