Published On : Thu, Jun 28th, 2018

कन्हान गोळीबारातील आणखी दोन आरोपींना अटक.

Advertisement
gun

Representational Pic

कन्हान : – शहरात अवैध धंदयाच्या वरचस्वा करिता दोन गटांचा आमना – सामना झाल्याने काडया, चाकू , गुप्ती,तलवार व देशी कट्टायाने गोळीबार करण्यातआला ज्यात तीन गंभीर जखमी झाले.या गोळीबाराच्या घटनेतील सात आरोपीना अटक करण्यात आली असून २ जुलै पर्यंत पी सी आर मिळाला आहे .
हा भयावह प्रकार मंगळवार दिनांक २६ जून रोजी रात्री ८.४५ ते ९ वाजता दरम्यान पिपरी रोडवरील अशोक नगर चर्ज जवळ घडला. यात अमर उर्फ गब्बर भारत सोनटक्के वय २८ वर्ष मु. पिपरी, रोहन श्याम खरे वय २४ वर्ष पाटील लेआऊट गहुहिवरा रोड कन्हान, व शुभम राजेश खोब्रागडे वय २२ वर्ष मु पिपरी यांना गंभीर जखमी करण्यात आले असुन त्याचा उपचार सुरू आहे .

घटनेवेळी शुभम खोब्रागडे आंबेडकर चौकातुन पिपरीला घरी परत जात असताना एका टोळीतील आरोपीनी संगनमत करून शुभम खोब्रागडे याचा पाठलाग करून खाली पाडुन उजव्या बजुच्या बरगडीवर चाकु मारून जखमी केले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे , पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे पोहचुन तपास दरम्यान एक गावठी कट्टा, काडया, तोडफोड केलेल्या दोन हिरोहोंडाच्या मोटार सायकल ताब्यात घेतल्या .

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे ,अतिरीक्त पोलीस अधिक्षक मोनिका राऊत, गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नागपूर ग्रामीण पथकाचे पोलीस सहाय्यक निरिक्षक अनिल राऊत, ए एस आय लक्ष्मीकांत दुबे, नाना राऊत, सुरज परमार, निलेश बर्वे, शैलेश यादव, प्रणय बनापार, साहेबराव बहाडे , फिंगर प्रिन्ट एक्सपर्ट, मौदा पोलीस निरीक्षक शेख व कन्हान पोलीस अधिकारी व सहकार्यासह रात्री व दिवसा उशीरा पर्यंत आरोपीचा शोध घेऊन आरोपीना अशोक नगर ला लागुन कोयला खदानच्या टेकडीवरील असलेल कृत्रिम जलसाठा जवळील जंगलात दळून बसलेल्या आरोपीना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

मूख्य आरोपी १) गौरव राजेश माहतो वय १९ वर्ष, २)ललीत परीहार वय २६ वर्ष , ३) मंगेश टेकाम वय २३ वर्ष, ४)वृषभ हावरे वय १९ वर्ष सर्व राहणार पिपरी यांचा कडून एक गावठी कट्टा व जिवंत काडतुस, एक गुप्ती, दोन चाकू ताब्यात घेण्यात आले. तसेच शुभम खोब्रागडे ला जखमी करणारे आरोपी १) खैलेश पंचम सलामे वय २६ वर्ष, २) शुभम ऊर्फ निखिल पंचम सलामे वय २४ वर्ष मु शिवाजी नगर कन्हान या दोघांना अटक करण्यात आली .

नागपूर ग्रामीण एल सी बी पथकानी रात्री व दिवसा शोध मोहीम राबवून ताब्यात घेऊन कन्हान पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.कन्हान पोलीसांनी सहाही आरोपीना कामठी न्यायालयात हजर केले असता २ जुलै पर्यंत पी सी आर देण्यात आला आहे . हा या घटनेतील आणखी आरोपी व शस्त्र कन्हान पोलीसांना शोधण्या करिता देण्यात आला आहे . आतापर्यंत सहा आरोपी व दोन मोटार सायकल, दोन गावठी कट्टे , एक जिवंत काडतुस, दोन चाकु, एक गुप्ती , काडया , दोन मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहे .

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.