Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Feb 25th, 2021

  नियम मोडणाऱ्या मंगल कार्यालयावर दोन लाख ३२ हजारांचा दंड

  आसीनगर झोनमधील एका मंगल कार्यालयावर ५० हजाराची तिसरी कारवाई

  नागपूर, : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेने नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई अधिक तीव्र केली आहे. वेळोवेळी ताकीद देऊनही नियम न पाळणाऱ्या शहरातील विविध मंगलकार्यालयांवर बुधवारी (ता, २४) सुमारे दोन लाख ३२ हजारांचा दंड मनपाने ठोठावला. विशेष म्हणजे आशीनगर झोनमधील एका मंगल कार्यालयावर तिसऱ्यांदा कारवाई करीत ५० हजारांचा दंड ठोठावला आहे.

  बुधवारी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये सर्वाधिक दंड आशीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या मंगल कार्यालयांवरील कारवाईतून वसूल करण्यात आला. सुमारे ७५ हजारांचा दंड या झोनअंतर्गत वसूल करण्यात आला. नागपूर महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या दहाही झोनमधील एकूण ९४ मंग़ल कार्यालयांची आज तपासणी करण्यात आली. यामध्ये लक्ष्मीनगर झोनमधील १०, धरमपेठमधील आठ, हनुमानगरमधील ११. धंतोलीमधील १०, नेहरूनगरमधील नऊ, गांधीबागमधील १२, सतरंजीपुरामधील १०, लकडगंजमधील १०, आसीनगरमधील नऊ आणि मंगळवारी झोनमधील पाच मंगल कार्यालयाची तपासणी मनपाच्या उपद्रव शोध पथकाने केली. यात मंगल कार्यालयासह हेल्थ क्लब, हॉटेलसह अन्य प्रतिष्ठांनांचीही तपासणी करण्यात आली.

  धरमपेठ झोनमध्ये भगवाघर येथील एका हॉटेलववर पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला. हनुमाननगर झोनमधील शारदा नगर येथील हेल्थ इम्युनिटी क्लबवर नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. धंतोली झोनमध्ये एकूण १० ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये गबरु टी स्टॉल गणेशपेठ (एक हजार रुपये), ज्योती कॉस्मेटिक (तीन हजार रुपये), मीरा वाईन शॉप (‌पाच हजार रुपये). एम्प्रेस मॉलमधील ट्रेन्ड शो रूम (१० हजार रुपये), काचोरे लॉन, मनीषनगर (१० हजार रुपये), तुलसी हॉटेल वंजारी नगर (पाच हजार रुपये). रिलायन्स फ्रेश मनीषनगर (तीन हजार रुपये). ट्रिलियम मॉलमधील टाईम झोन (पाच हजार रुपये). ट्रिलियम मॉलमधील बुक ट्रंक (पाच हजार रुपये). मेडिकल चौकातल एसएमई वॉईन शॉप (दहा हजार रुपये). नेहरु नगर झोनअंतर्गत आयडियल अकादमी आशीर्वाद नगर (१० हजार रुपये). चाणक्य लायब्ररी, भांडे प्लॉट (पाच हजार रुपये). गांधीबाग झोनअंतर्गत नंगा पुतळाजवळील अभिनंदन रेस्टॉरंट (पाच हजार रुपये). सतरंजीपुरा झोनअंतर्गत राधाकृष्णा सेलिब्रेशन (२० हजार रुपये). आसीनगर झोनअंतर्गत खोब्रागडे लॉन सिद्धार्थ नगर (२५ हजार रुपये). गोत्र लॉन, टेका नाका (५० हजार रुपये). मंगळवारी झोनअंतर्गत मंगल मंडप कडबी चौक (पाच हजार रुपये), राज सेलिब्रेंशन लॉन, गोरेवाडा रोड (२० हजार रुपये) अशी दंडात्मक कारवाई करण्यात आली.

  कोरोनाला नियंत्रित करण्याची जबाबदारी ही केवळ प्रशासनाचीच नसून नागरिकांचीही आहे. त्यामुळे स्वत:ची जबाबदारी ओळखा. प्रशासनाने आखून दिलेले नियम पाळा आणि कोरोनाची साखळी खंडित करा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145