Advertisement
नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या बिडगाव परिसरात ट्रकने दोन मुलांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवल्याने तेथील वातावरण चांगलेच तापले होते. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुली बाहेर खेळत असताना भरधाव चाललेल्या ट्रकने त्यांना धडक दिली. दोन्ही मुली चाकाखाली आल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नागपूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन विभागानेही घटनास्थळी धाव घेत पेटलेल्या ट्रकची आग नियंत्रणात आणली. दरम्यान वाठोडा पोलिसांनी आरोपी ट्रक चालकावर भादंविच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.