नागपूर : दोन मुलींचे चाकूच्या धाकावर अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी नागपुरातील वाठोडा पोलिसांनी दोघांना अटक केली. रामदयाल पंचम तांडेकर (वय 27, रा. वाठोडा) आणि रोहन अशोक बिंजरे (20, रा. आसोली, जि. गोंदिया) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी दोघे 18 वर्षीय पीडित तरुणीशी ओळखत होते आणि ते वाठोडा परिसरात राहत होते. त्याच परिसरात राहणाऱ्या 14 वर्षीय तरुणीची ती मैत्रीण होती. रामदयाल आणि रोशन यांनी 1 मे रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास या दोन्ही मुलींना खरबी येथे बोलावले. दोन्ही मुली आल्यानंतर त्यांना बाहेरगावी जाण्याच्या बहाण्याने स्वतंत्र मोटारसायकलवर नेले.
नियोजनानुसार रामदयाल आणि रोहनने मुलींना हुडकेश्वर परिसरातील सूर्या नगरजवळील घरात नेले. त्यांनी घराला आतून कडी लावली. चाकूच्या धाकावर रामदयालने १८ वर्षीय मुलीवर बलात्कार केला तर रोहनने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची वाच्यता केल्यास पीडित मुलींना आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आरोपींची घटनास्थवरून पळ काढला.
अल्पवयीन मुलीने आईला या घटनेची माहिती दिल्यानंतर रामदयाल आणि रोहनविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे, भारतीय दंड संहितेच्या कलम 363, 376(2)(जे), 506 (बी) अन्वये, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण या कलम 4, 8, 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे.आरोपी रामदयाल आणि रोहन यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.