Published On : Tue, Apr 14th, 2020

नागपूरमध्ये कोरोनाचे आणखी 2 नवे रुग्ण, 12 तासात 9 नवे कोरोनाबाधित रुग्ण

Advertisement

नागपूर : राज्यात कोरोनाचं संक्रमण वाढत चाललं आहे (Corona patients in Nagpur). नागपुरात कोरोनाचे आणखी 2 नवे रुगण आढळले आहेत. गेल्या 12 तासात तब्बल 9 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. या 9 रुग्णांपैकी तिघांची तपासणी शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेत करण्यात आली. तर 6 जणांची तपासणी एम्समधील प्रयोगशाळेत करण्यात आली होती. या नव्या 9 रुग्णांमुळे नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 56 वर पोहोचली आहे (Corona patients in Nagpur).

नागपुरात गेल्या 12 तासात आढळलेले सर्व नवे कोरोनाबाधित रुग्ण सतरंजीपुरा भागात मृत्यू झालेल्या 68 वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. नागपुरच्या सतरंजीपुरा येथे पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. या रुग्णाच्या 6 एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता.


नागपूरमधील अनेक परिसर सील

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. नागपूरमध्ये ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तो परिसर पूर्णपणे सील करण्यात येत आहे. आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे याकडे लक्ष देत आहेत.