Published On : Wed, Oct 24th, 2018

नागपूर विमानतळावर आढळले दोन बॉम्ब! मॉक ड्रील

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास माओवाद्यांनी टर्मिनल बिल्डिंगमध्ये दोन बॉम्ब ठेवल्याची सूचना मिळाली. थोड्याच वेळात बॉम्बचा शोध घेऊन ते निकामी करण्यात आले. यादरम्यान विमानतळाच्या आतील सर्व कर्मचारी व प्रवाशांना टर्मिनल बिल्डिंगपासून दूर ठेवण्यात आले होते.

मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत विमानतळावर नेहमीप्रमाणे सामान्य परिस्थिती होती. दुपारी २.२० च्या सुमारास एअर एशियाच्या बुकिंग आॅफिस व एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडिया(एएआय)ला एक फोन कॉल आला. यात सांगण्यात आले की, काही व्हीव्हीआयपींना उडविण्यासाठी माओवाद्यांनी विमानतळावर दोन बॉम्ब पुरलेले आहेत. परंतु व्हीव्हीआयपींनी विमान प्रवास रद्द केल्याबाबतचा पुन्हा कॉल आला व पुरण्यात आलेल्या दोन्ही बॉम्बचा एक तासाचा स्फोट होणार असल्याची माहिती देण्यात आली. यानंतर संबंधित सुरक्षा यंत्रणेला याची माहिती देण्यात आली.

Advertisement

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला(सीआयएसएफ)च्या सशस्त्र जवानांनी मोर्चा सांभाळला. या सुरक्षा यंत्रणेचे श्वान पथकही पोहोचले. विमानतळाच्या आतील अनेक लोकांना नेमके काय सुरू आहे, याची माहिती नव्हती. यादरम्यान मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) च्या अग्निशमन दलाचे कर्मचारी डिपार्चर गेटवर सज्ज झाले. २.३० ला पोलीस बॉम्ब शोधक पथक पोलिसांच्या मदतीला दाखल झाले. काही वेळातच महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्याही आल्या.
यादरम्यान सुरक्षा रक्षकांनी शिटी वाजवून ड्रॉप अॅन्ड गो झोनपासून दूर राहण्याचे लोकांना तसेच वाहनांना दूर ठेवण्याचे सांगण्यात आले. एमआयएल, एएआय व एअरलाईन्सचे कर्मचारी प्रसंगावधान ओळखून सतर्क झाले अन् सुरक्षा जवानांसोबत कामाला लागले.

Advertisement

सीआयएसएफच्या श्वान पथकाने २.४५ ते २.५० दरम्यान पुरून ठेवलेल्या बॉम्बचा शोध घेतला. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकातील जवानांनी स्फोटक रोधक गणवेश परिधान करून बॉम्ब काढले. दोन्ही बॉम्ब निकामी केले. हा प्रकार मॉक ड्रीलचा एक भाग होता. परंतु मॉक ड्रीलची कार्रवाई पूर्ण होईपर्यंत स्थानीय प्रशासनाची अॅम्बुलन्स आली नव्हती. बॉम्बचा शोध घेतल्यानंतर ३.५० वाजता राज्य शीघ्र कृती दलाचे जवान पोहोचले.

ब्युरो आॅफ सिव्हिल एव्हिएशन सेफ्टी(बीसीएएस)च्या दिशानिर्देशानुसार दरवर्षी ही प्रक्रि या केली जाते. यात सर्व एअरलाईन्सची सुरक्षा यंत्रणा, स्थानिक पोलीस व अन्य संबंधित विभाग सहभागी झाले होते. या मोहिमेतील काही ठराविक लोकांना वगळता याची कुणालाही माहिती नव्हती की ही एक मॉक ड्रील आहे.

बैठकीत झाली चर्चा
मॉक ड्रीलनंतर जुन्या टर्मिनल बिल्डिंगच्या सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात एमआयएलचे सिनियर एअरपोर्ट डायरेक्टर विजय मुळेकर, मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंत सरडकर, सीआयएसएफचे असिस्टंट कमांडंट टी.डी. विन्सेंट, एमआयएलचे अधिकारी लक्ष्मीनारायण, सोनेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यासह अन्य विभाग व एअरलाईन्सचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कारवाईच्या वेळेसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी निकषानुसार ड्रीलमध्ये सहभागी विभागांनासुद्धा माहिती पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement