Published On : Wed, Feb 26th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात एटीएममधून पैसे पळवणाऱ्या दोघांना अटक,सीसीटीव्ही फुटेजद्वारे लागला आरोपींचा छडा

नागपूर : वाडी परिसरात एटीएम फसवणूक करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून पैसे काढत होते. सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपींबद्दल सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली.

अटक केलेल्या आरोपींची नावे रोशन उर्फ मोंटी सॅम्युअल वर्मा आणि पलाश उर्फ गोच्य राजेंद्र मेश्राम अशी आहेत, दोघेही इमामवाडा येथील रहिवासी आहेत.

Gold Rate
27 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,100 /-
Gold 22 KT ₹ 1,06,100 /-
Silver/Kg ₹ 1,43,400/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

२४ फेब्रुवारी रोजी दोन्ही आरोपी खडगाव रोडवरील अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पोहोचले . त्यात ॲल्युमिनियम स्ट्रिप टाकून कॅश डिस्पेंसर जाम केले. यामुळे, जेव्हा जेव्हा ग्राहक पैसे काढण्यासाठी येत असत तेव्हा त्यांचे पैसे मशीनमध्ये अडकत असत. नंतर, संधी मिळताच आरोपी एटीएममधून पैसे काढत असत.

पोलिसांनी एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन्ही आरोपींचे दुष्कृत्य समोर आले. फुटेजच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांनाही अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडून चोरी केलेल्या रक्कमेसह ७०,७०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

Advertisement
Advertisement