Published On : Thu, Jun 5th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील जरीपटका येथे एमडी ड्रग्ज विक्रीप्रकरणी दोघांना अटक ; ‘ऑपरेशन थंडर’अंतर्गत पोलिसांची कारवाई

Advertisement

नागपूर – शहरात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेअंतर्गत पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विरोधात पुन्हा एक मोठी कारवाई केली आहे. जरिपटका पोलिसांनी चावला चौक परिसरातून (MD) ड्रग्ज विक्री करत असलेल्या दोघा तरुणांना रंगेहात पकडले आहे.

पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की दोन तरुण चावला चौकात MD ड्रग्ज विक्रीसाठी थांबले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्या ठिकाणी छापा टाकला आणि नितेश विखानी व आकाश केवलरमानी या दोघांना अटक केली.

तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून ५ ग्रॅम MD ड्रग्ज आणि दोन मोबाईल फोन्स जप्त करण्यात आले. जरिपटका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे तरुण गेल्या काही काळापासून स्थानिक ग्राहकांना MD ड्रग्ज पुरवत होते. पोलिसांनी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून अखेर कारवाई केली.

सध्या पोलिसांकडून या ड्रग्जचा स्त्रोत काय होता, याचा तपास सुरू असून या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराला मोठा धक्का बसला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.