Published On : Mon, Sep 26th, 2022
By Nagpur Today Nagpur News

कल्पेश बावनकुळे च्या हत्येचे दोन आरोपी पोलीसांच्या ताब्यात

Advertisement

सकरदरा पोलीसांनी आरोपी पकडण्यास केली मौलाती कामगिरी.

कन्हान : – बनपुरी येथील कल्पेश भगवान बावनकुळे हा नागपुर वरून डि जे वाजवुन रात्री घरी दुचाकीने परत जात असताना बोरडा रोडवरील पेट्रोल पंप जव ळ दोन अज्ञात आरोपीने दुचाकी अडवुन तिघाना खाली पाडले. तिघेही उठुन पंपकडे पळत असताना कल्पेश ला पकडुन त्याच्या पाठीवर, पोटावर, छाती वर, हातावर व गळयावर धारदार शस्त्राने सपासप ३१ घाव मारून निर्दयतेने हत्या करणारे दोन आरोपी सकरदरा पोलीस स्टेशन च्या सहकार्याने पोलीसाना पकडण्यास यश आले आहे.

शनिवार (दि.१०) सप्टेंबर २०२२ ला नागपुर येथील गणेश विसर्जनात डि जे वाजविण्याचा ऑडर करून डिजे मालक कल्पेश भगवान बावनकुळे वय ३० वर्ष व डि जे ऑपरेटर सुरज सुनिल ढोबळे वय २२ वर्ष व हेल्पर जितेंद्र रमेश ढोबळे वय २४ वर्ष तिघे ही राहणार बनपुरी. ता पारशिवनी हे नागपुर वरून रात्री ११.३० वाजता घरी बनपुरी ला दुचाकी क्र एम एच ४९ बी एल ५६२८ अँक्टीव्हाने परत येत असताना कल्पेश दुचाकी चालवित असुन दोघे मागे बसले होते. कन्हान वरून बोरडा रोडने जात असताना बोरडा रोड वरील पंप च्या थोडया सामोर काही अंतरावर नागपुर चारपदरी महामार्गा जवळ रात्री १२.३० वाजता दरम्या न अज्ञात आरोपीने त्यांची दुचाकी अडवित दुचाकीसह तिघाना खाली पाडले असता ते उठुन जिव वाचविण्या स पेट्रोल पंप कडे पळताना आरोपीने कुठलेही कारण नसताना कल्पेश ला पकडुन धारदार शस्त्राने पाठी वर , पोटावर, छातीवर, हातावर व गळयावर सपासप ३१ घाव मारून निर्दयतेने हत्या करून आरोपी पळुन गेले होते.

तर मागे स्वार दोघे सुरज व जितेंद्र हे पेट्रोल पंप पळुन गेल्याने सुखरूप वाचले. कन्हान पोलीसानी फिर्यादी वडील भगवान राघोबाजी बावनकुळे यांचे तक्रारीने अज्ञात आरोपीं विरोधी अप क्र ५२५/२२ कलम ३४१, ३०२, ३४ भादंवी अन्वये गुन्हा दाखल करून डीजे मालक कल्पेश बावनकुळे ची अज्ञात आरोपींंने निर्दयतेने हत्या केल्याने ही हत्या डिजे व्यवसायातुन केली असल्याचा प्राथमिक अदाजा वरून कन्हान पोलीसचे दोन पथक व स्थागुअ शाखा नागपुर ग्रामिण चे पथक हत्येच्या आरोपींताचा शोध करित शोध घेत १३ दिवस झाल्यावर सकरदरा पोलीस स्टेशन अंतर्गत ताजबाग परिसरात काही दिवसा पुर्वी शेख नौशाद वर आरोपी आशिष उर्फ मोनु मनपिया व अन्य दोन आरो पीने रिवाल्वर तानुन जिवे मारण्याच्या पर्यंत केल्या प्रकरणी सकरदार पोलीसा नी आशिष मनपिया वय ३० वर्ष राह भिलगाव, नागपु र व अन्य दोन आरोपी ला अटक करून तपास करित असताना आशीष उर्फ मोनु मनपिया यांनी बोरडा रोड कांद्री कन्हान येथे कल्पेश बवनकुळे यांची हत्या केल्याचे कबुली दिल्याने कन्हान पोलीसाना माहीती दिल्याने यातील आरोपी विक्की क्रिष्णा उके वय ३० वर्ष राह.

Advertisement

जवाहर नगर पांधन रोड कन्हान यास कन्हान पोलीसानी पहाटे सकाळी कन्हान येथुन पकडुन अटक केली असुन हत्येत वापरण्यात आलेली चारचाकी वाहन सुध्दा ताब्यात आहे. तर सकरदार पोलीसाच्या ताब्यात आशिष उर्फ मोनु मनपिया अस ल्याने कल्पेश बावनकुळे हत्येचे दोन आरोपी अटक करण्यात आले असुन अन्य आरोपीचा व मुख्य सुत्रदार आणि हत्या करण्याच्या उद्देश कन्हान पोलीस तपास करित आहे. कन्हान पोलीसाना आरोपी विक्की उके चा तपास करण्याकरिता (दि ३०) सप्टेंबर पर्यंत पीसीआर मिळाला आहे.

ही कार्यवाही सकरदरा पोलीस स्टेशनचे पी आय धनजय पाटील, ए पी आव्हाड, एपीआय कशोधन, कामठी उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान, गुन्हे शाखे चे पोलिस निरिक्षक कोकाटे व पथक, कन्हान थानेदार विलास काळे, संपोनि सतिष मेश्राम, ए पी आय प्रयाग फुलधेले, नरेश वरखडे, गणेश पाल, खुशाल रामटेके, मंगेश ढबाले, सम्राट वनपरेती, वैभव बोरपल्ली, अतिश मानवटकर आदी ने सक्रिय सहभाग घेत कामगिरी बजावित आहे.

कल्पेश बावनकुळे हा बनपुरी येथील रहिवासी असुन शेती ला जोड धंदा म्हणुन डि जे व डेकोरेशन चे काम करित होता. त्याला वडील, आई, लहान भाऊ, एक वर्ष पहिले गावातीलच मुली सोबत लग्न झाले असुन त्याला सहा महिन्याची छोटीशी मुलगी आहे. यामुळे कल्पेश च्या निर्दयी पणे केलेल्या हत्येने त्याच्या परिवारावर फार मोठे दु:खाचे डोंगर कोसळले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.