Published On : Fri, Sep 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय; महाप्रसाद, भंडारा, लंगरसाठी FDAला ७ दिवस आधी पूर्वसूचना बंधनकारक!

Advertisement

Maha FDA suspends food licenses of railway catering supplier, 20 eateries

नागपूर : राज्यातील महाप्रसाद, भंडारा, लंगर, इफ्तार पार्टी आणि अन्नछत्राच्या माध्यमातून होणाऱ्या सामूहिक अन्नवाटपावर आता अन्न व औषध प्रशासनाची (FDA) करडी नजर राहणार आहे. अन्नाची गुणवत्ता आणि भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न सुरक्षा विभागाने ‘सण उत्सव अन्न सुरक्षा अंमलबजावणी स्थायी आदेश २०२६’ जारी केला आहे.

या आदेशानुसार सामूहिक अन्नवाटपाचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना किमान सात दिवस आधी अन्न व औषध प्रशासनाला पूर्वसूचना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. पूर्वसूचना न दिल्यास आवश्यक परवानगी मिळण्यात अडचणी येऊ शकतात. विनामूल्य किंवा नाममात्र दरात अन्नवाटप करणाऱ्या संस्थांनाही हे नियम लागू राहणार आहेत. लग्नसमारंभांसाठीही अन्न सुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Gold Rate
Sept 10,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 54,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,39,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सनदी अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. राज्यातील विविध धर्मांच्या सण-उत्सव, यात्रा, जत्रा, ऊरूस आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये अन्नपदार्थांची भेसळ रोखणे तसेच अन्नातून होणाऱ्या आजारांच्या घटना टाळणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. हे नियम कोणाला त्रास देण्यासाठी नसून नागरिक आणि भाविकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

तीन श्रेणींमध्ये सण-उत्सवांची विभागणी
अन्न सुरक्षा विभागाने सण-उत्सवांची तीन श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. प्रथम श्रेणीत गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, नाताळ, नववर्ष स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या कार्यक्रमांचा समावेश आहे.

Advertisement

द्वितीय श्रेणीत मकर संक्रांती, महाशिवरात्र, होळी, गुढीपाडवा, आषाढी व कार्तिकी वारी, श्रावण मास, कृष्णजन्माष्टमी, दहीहंडी, कोजागिरी आणि गुरुनानक जयंतीचा समावेश करण्यात आला आहे.

तर तृतीय श्रेणीत स्थानिक यात्रा, जत्रा, पालखी सोहळे, ऊरूस आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचा समावेश आहे.

महिन्याची स्वतंत्र दिनदर्शिका तयार होणार
राज्यातील विविध सण, उत्सव, यात्रा, जत्रा, ऊरूस आणि धार्मिक कार्यक्रमांची महिनानिहाय दिनदर्शिका अन्न व औषध प्रशासनाकडून तयार केली जाणार आहे. या कार्यक्रमांमध्ये कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थांचे वाटप केले जाते, याचाही आढावा घेतला जाणार आहे.

सामूहिक अन्नवाटपाच्या ठिकाणी FDAचे अधिकारी प्रत्यक्ष भेट देऊन अन्नाची तपासणी करतील. आवश्यकतेनुसार अन्नपदार्थांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे. या काळात अन्न परीक्षण प्रयोगशाळांनीही तत्पर राहावे, अशा सूचना विभागाने दिल्या आहेत.

चार टप्प्यांत होणार अंमलबजावणी
या आदेशाची अंमलबजावणी चार टप्प्यांत केली जाणार आहे. या कालावधीत अन्नपदार्थांचे उत्पादन करणारी केंद्रे, घाऊक व्यापारी आणि गोदामांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थ तयार करणारे आणि वितरित करणारे यंत्रणा आता FDAच्या विशेष निरीक्षणाखाली राहणार आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.