Published On : Fri, Sep 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

कांद्री चेकपोस्टवर ट्रकचालकाला मारहाणीचा आरोप; महामार्गावर आंदोलन

अवैध वसुलीच्या आरोपावरून वाद; नागपूर-जबलपूर महामार्गावर दोन तास वाहतूक विस्कळीत
Advertisement

कांद्री चेकपोस्टवर ट्रकचालकाला मारहाणीचा आरोप; महामार्गावर आंदोलन

नागपूर, रामटेक: नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कांद्री चेकपोस्टवर ट्रकचालकाला मारहाण झाल्याचा आरोप करत संतप्त ट्रकचालकांनी महामार्गावर ट्रक उभे करून आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून सुमारे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली.

ही घटना 26 सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे 12 वाजता कांद्री चेकपोस्ट परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Gold Rate
Sept 24,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ट्रकचालकांच्या आरोपानुसार, कांद्री चेकपोस्टवर काही स्थानिक व्यक्तींकडून ट्रकचालकांकडून अवैधरीत्या पैशांची वसुली केली जात असल्याचा आरोप आहे. दरम्यान, एका ट्रकचालकाने इतर ठिकाणचे चेकपोस्ट बंद असताना महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील कांद्री चेकपोस्ट सुरू का आहे, अशी विचारणा केल्याचे सांगण्यात येते.

या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी ट्रकचालकाची कॉलर पकडून त्याला ट्रकमधून खाली खेचले आणि मारहाण केल्याचा आरोप ट्रकचालकांनी केला आहे.

Advertisement

हा प्रकार पाहून संतप्त झालेल्या इतर ट्रकचालकांनी आपले ट्रक महामार्गावरच उभे करून आंदोलन सुरू केले. यावेळी ट्रकचालक आणि संबंधित व्यक्तींमध्ये शाब्दिक वाद झाला. पुढे या वादाचे रूप हाणामारीत झाल्याने कांद्री चेकपोस्ट परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

आंदोलनामुळे नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. ट्रकचालकांनी कांद्री चेकपोस्ट बंद करण्याची मागणी करत महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी आंदोलनकर्त्या ट्रकचालकांशी चर्चा केली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आणि सुमारे दोन तासांनंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

दरम्यान, ट्रकचालकाला मारहाण झाल्याचा आरोप असलेला प्रकार चेकपोस्टवर उपस्थित आरटीओ अधिकाऱ्यांसमोरच घडल्याचा दावा ट्रकचालकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ट्रकचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

इतर चेकपोस्ट बंद असताना कांद्री बॉर्डरवरील चेकपोस्ट सुरू ठेवण्यात आले असून तेथे अवैध वसुली केली जात असल्याचा आरोपही ट्रकचालकांनी केला आहे. कथित वसुली तात्काळ बंद करून कांद्री चेकपोस्ट बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मात्र, या आरोपांबाबत संबंधित विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे आरोपांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.

प्रतिनिधी – अजय मेहरकुळे

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.