Advertisement
अमरावती : जिल्ह्यात ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाल्याचं वृत्त आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलीसह आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे. मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याचं सांगण्यात येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अंजनगाव बारी येथील पोकळे कुटुंबीय तवेरा कारनं लग्नाची बोलणी करण्यासाठी गावाकडे निघाले होते. अमरावती शहराच्या बाहेर नागपूर रोडवरील रिंगरोडवर कठोरा-रहाटगाव मार्गावर त्याच्या तवेराची आणि ट्रकची जोरदार धडक झाली.
ही धडक इतकी भीषण होती की, तवेरामधील दहा जण गंभीर जखमी झाले. यांपैकी चार जणांचा जागीच मृत्यू झाला, इतर सर्वांना खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. पण या जखमींपैकी आणखी एकाचा मृ्त्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
Advertisement