Published On : Tue, Jun 11th, 2019

वृक्षलागवड मोहीमेत बचतगटांचेही सहकार्य घ्यावे – चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement

नागपूर: वृक्षलागवड मोहिमेत शासकीय यंत्रणा, सामान्य नागरिक, अशासकीय संस्था यासह बचतगटांना सहभागी करून त्यांचे सहकार्य घ्यावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. बचतभवन येथे आज पालकमंत्र्यांनी सन 2019 मधील 33 कोटी वृक्षारोपण कार्यक्रमाचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

बैठकीला आमदार अनिल सोले, सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, महापौर नंदा जिचकार यासह अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके उपस्थित होते. जिल्ह्याचे यावर्षीचे उद्दिष्ट 98.39 लक्ष आहे. त्यामध्ये प्रादेशिक वनविभाग 26.62 लक्ष, सामाजिक वनिकरण 15 लक्ष, महाराष्ट्र वनविकास महामंडळ 5.81, ग्रामपंचायत 25.06 व इतर विभाग मिळून 25.90 लक्ष इतके उद्दिष्ट आहे.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी विभागनिहाय आढावा घेतला. त्यामध्ये उपविभागीय अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी समन्वयाने काम करून तालुकानिहाय खड्डे खोदण्याच्या कामाला गती द्यावी. निर्धारित लक्ष्यांक साध्य करण्यासाठी साधारणत: तिप्पट नियोजन करावे अशा सूचना दिल्यात. सामाजिक वनिकरण विभागाने सर्व यंत्रणांना मागणीप्रमाणे रोप उपलब्ध करून द्यावीत. नुकतीच वनमंत्री महोदयांनी विभागाची बैठक घेतली.

Advertisement

पुढील आठवड्यात सर्व लोकप्रतिनीधींची विभागीय आयुक्तांसोबत या मोहिमेची प्रगती जाणून घेण्यासाठी बैठक होईल. 1 जुलै पासून मोहीम सुरू होईल. मोहिमेत वृक्ष लागवडीसोबतच संगोपन देखील गरजेचे आहे. त्यासाठी ट्री गार्डची देखील व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.