Published On : Wed, May 5th, 2021

लॉकडाऊन काळात फक्त ई पासव्दारे सुरक्षित प्रवास करा.- पालकमंत्री डॉ.नितीन राऊत

Advertisement

नागपूर : जिल्हयात कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता नागरिकांनी ई पासव्दारे सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज केले . शासनाने आंतरजिल्हा व शहराबाहेर प्रवास करण्यासाठी निकडीच्या ,आवश्यक सेवा असलेल्या प्रवाशासाठी वाहनक्षमतेच्या 50 टक्के प्रवास करू शकण्याचे आदेश काढले आहेत. कोरोना संसर्ग पसरू नये म्हणून या निर्बधकाळात केवळ अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. तसेच केवळ अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडण्याची मुभा नागरिकांना देण्यात आली आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना अत्यंत आवश्यक कामासाठी प्रवास करायचा असल्यास ई-पास (E-Pass) प्रणाली आहे covid19.mhpolice.in या पोर्टलवर ई-पास मिळविण्याकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.

पोलीस विभागाकडून आवेदनात दिलेल्या कारणाची खात्री करून प्रवासासाठी ई-पास देण्यात येईल. ई-पास मिळवून तुम्ही प्रवास करु शकता. परंतु, हा ई-पास नेमका मिळवायचा कसा? जाणून घेऊया…

ई पास काढण्यासाठी covid19.mhpolice.in/या वेबसाईटला भेट दया.त्यानंतर वेबसाईटवर दिलेल्या सूचना वाचून घ्या.सूचना वाचून झाल्यानंतर तुम्ही ई-पाससाठी अर्ज करा या बटनावर क्लिक करा पुढे जा.महाराष्ट्राबाहेर जायचे आहे की नाही यावर क्लिक करा.

स्टेप 1-जिल्हा किंवा पोलीस आयुक्तालय निवडा

स्टेप 2 – तुमचे संपूर्ण नाव नोंद करा

स्टेप 3- प्रवास कोणत्या तारखेपासून ते कित तारखेपर्यत करणार ते नमूद करा.

स्टेप4- मोबाईल नंबर आणि प्रवासाचे कारण आणि प्रवासाचा उददेश सविस्तरपणे नोंद करा.

स्टेप 5 -वाहनाचा प्रकार,वाहनाचा नोंदणी क्रमांक,सध्याचा पत्ता,आणि ई-मेल नोंद करा

स्टेप 6- प्रवास जिथून करणार ते ठिकाण,प्रवासाचे अंतिम ठिकाण ,सहप्रवासी संख्या नमूद करा

स्टेप 7 -आपण कटेंन्टमेंट झोनमधील आहात का याविषयी माहिती सादर करा

स्टेप 8- परतीचा प्रवास याच मागानं करणार का हे नमूद करा.

स्टेप 9- 200 केबीपेक्षा लहान साईजचा पासपोर्ट फोटो अपलोड करा, आणि सर्व माहिती चेक करून अर्ज सादर करावा.

ई पाससाठी वेबसाईटवर अर्ज केल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आल्यानंतर टोकन क्रमांक नोंदवून ई-पास पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करा. आणि प्रिंट आऊट काढून ठेवा.

ई -पास काढण्याबाबत शहरात परिमंडळ निहाय पोलीस कर्मचारी व त्यांचे मोबाईल नंबर दिले आहेत. त्यानुसार परिमंडळ क्र.1 साठी पोलीस उपनिरीक्षक विशांत नांदगाये ,0712-2233188,0712-2233996, परिमंडळ क्र.2 साठी पोलीस उपनिरीक्षक कृणाल धुरट 0712-2559922,0712-2566607,परिमंडळ क्र.3 पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील,0712-2738282, परिमंडळ क्र.4 पोलीस उपनिरीक्षक कुरेवाड 0712-2747753,परिमंडळ क्र.5 जाधव 0712-2683676 या क्रमांकावर संपर्क करुन माहिती घेता येईल.

वाहतूक विभाग 0712-2564550 या क्रमांकावर ई-पासबाबत काही अडचण असल्यास संपर्क करता येईल.