Published On : Tue, Jan 21st, 2020

सीमेंट रोड बांधकामाकरिता वाहतूक बंद

Advertisement

मनपा आयुक्तांचे आदेश : दीक्षाभूमी चौक ते उत्तर अंबाझरी मार्गावरील वाहतूक ३० मार्चपर्यंत प्रलंबित

नागपूर, : नागपूर महानगरपालिकेद्वारे सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ अंतर्गत दीक्षाभूमी चौक ते उत्तर अंबाझरी मार्गापर्यंतची वाहतूक सीमेंट रोड बांधकामाकरिता बंद करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिकेद्वारे सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ पॅकेज क्रमांक ९ मधील रस्ता क्रमांक ३५ दीक्षाभूमी चौक ते उत्तर अंबाझरी मार्गापर्यंतपर्यंत सीमेंट रस्ता तयार करण्यात येणार आहे. या कामामुळे या मार्गावरील डाव्या बाजूची वाहतूक ३० जानेवारी २०२० ते ३० मार्च २०२० पर्यंत बंद राहणार आहे.

सदर मार्गावरील वाहतूक उजव्‍या बाजूने व लगतच्या रस्त्यावरून वळविण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. सदरबाबतचे लेखी आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.