Published On : Tue, Dec 27th, 2022
By Nagpur Today Nagpur News

गिट्टीखदान चौक ते दिनशा फॅक्टरी वाहतूक प्रतिबंधित

Advertisement

मनपा आयुक्तांचे आदेश : ३१ मार्च २०२३ पर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक बंद

नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे सिमेंट कॉक्रीट रोड नागपूर शहर टप्पातील उर्वरीत काम रोड नं 21, गिट्टीखदान चौक ते दिनशा फॅक्टरी दोन्ही बाजू दरम्यान रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याचे प्रस्तावित केलेले आहे. प्रस्तुत कामाकरिता या रस्त्यावरील वाहतुक प्रतिबंधित करणे आवश्यक असल्याने, गिट्टीखदान चौक ते दिनशा फॅक्टरी दोन्ही बाजू दरम्यान रस्ता कोणत्याही वाहतुकीस बंद करण्याचे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.

नमूद रस्त्यावरील वाहतूक डावी बाजु वाहतुकीस बंद केल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक रस्त्याच्या उजव्या बाजुस वळवण्यात येत आहे. तसेच डाव्या बाजुस काम पूर्ण करुन उजव्या बाजुस वाहतुकीस बंद केल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक रस्त्याच्या डाव्या बाजूला वळवण्यात येईल. सदर आदेश दिनांक 31 डिसेंबर 2022 पासून दिनांक 31 मार्च पर्यंत अंमलात राहील. असे आदेशात नमूद केले आहे.

काम सुरू असलेल्या ठिकाणी मनपा आयुक्तांद्वारे जारी करण्यात आलेले आदेशात या रस्त्यादरम्यान दोन्ही बाजूस ठळक अशा ठिकाणी नागरिकांच्या सुचनेकरिता फलक लावणे, सदर रस्ता वाहतूक बंद करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी कांबी किंवा खांब व इतर संपर्क साधने वापरून रस्त्यावरील वाहतूक बंद करणे, आवश्यक वळण मार्ग दर्शविणारे फलक योग्य त्या ठिकाणी उभारणे, या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी असलेल्या नागरिकांच्या सोयीकरिता अशी व्यवहार्य सुविधा उपलब्ध करणे तसेच विहित कालमर्यादेत काम पूर्ण करून रस्ता वाहतूकीस खुला होईल यादृष्टीने कार्यवाही करण्याचेही आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

रात्रीचे वेळी वाहनचालकांना माहितीकरीता एलईडी डाव्हर्सन बोर्ड लावणे आवश्यक आहे. बॅरीगेटींगवर एलएडी माळा लावणे आवश्यक आहे. उजव्या बाजुचे दुतर्फा व हतुक चालणार आहे त्या ठिकाणी अस्थाई रस्ते दुभाजक तयार करुन एकाच मार्गावरुन दुतर्फा वाहतुक वळविण्यात यावी. अनुचित प्रकार घडल्यास कंत्राटदार स्वतः जबाबदार राहतील. वाहतुक नियमांचे तसेच वाहतुक पोलीसंनी दिलेल्या दिशा निर्देशाचे पालन करावे. या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी किंवा कार्यालय असलेल्या नागरीकांचे सोयीकरिता आवश्यक अशी व्यवहार्य उपलब्ध करुन घ्यावी. असे आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.